वैजापूर तालुक्यात बेमोसमी पाऊसामुळे वीज पडून शेतकऱ्याचे 400 क्विंटल कांदा जळून खाक..
वैजापूर (राजेंद्र धिंगाण) पानवी खंडाळा ता. वैजापूर येथील शेतकरी वाल्मीक लक्ष्मण मुंडे यांच्या शेतात चाळ मध्ये साठवणूक केलेला 400 क्विंटल कांदा आज दुपारी बेमोसमी झालेल्या पाऊसामुळे वीज पडून संपूर्ण खाक झाला. यामध्ये शेतकरी मुंडे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सद्यस्थितीत कांद्याला अपेक्षित भाव नसल्याने मुंडे यांनी त्यांच्या चाळी मध्ये कांदा साठवणूक करून जमा केलेला होता. दोन दिवसापासून बेमोसमी वादळ मुळे आज पाऊस पडून कांदा चाळीवर वीज पडून कांदा चाळ संपूर्ण खाक झालेली आहे. याबाबत नुकसान भरपाई होणेकामी वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरणारे सर यांनी संबंधित विभागास तात्काळ आदेश द्यावेत तसेच कृषी विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळणेकामी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा अशी मागणी ग्रामस्थकडून होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख




























