मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र

मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ. स्वाती मगर यांची ‘महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, नाशिक जिल्हा अध्यक्ष’पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे अधिकृत पत्र पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीने नुकतेच जारी करण्यात आले आहे.सौ. स्वाती मगर यांच्याकडे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, येवला आणि निफाड या तीन महत्त्वपूर्ण कार्यक्षेत्रांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.पक्षाचे ध्येय-धोरण आणि निष्ठेने कामाचे आदेश राज ठाकरे यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रात नमूद केले आहे की, पक्षाचे ध्येय-धोरण व कार्यक्रम संघटनेत निष्ठेने राबवावेत. कामात कोणतीही कुचराई किंवा तडजोड स्वीकारली जाणार नाही, तसेच समाजाला त्रास होणार नाही अशा प्रकारे पक्षकार्य घडणे अपेक्षित आहे.सदरील नियुक्ती ही एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली असून, या कालावधीतील कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
मराठी बांधवांना, भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल असे कार्य तुमच्या हातून घडो, अशा शुभेच्छा राज ठाकरे यांनी या पत्राद्वारे दिल्या आहेत. सौ. स्वाती मगर यांच्या या निवडीमुळे नांदगाव, येवला व निफाड परिसरातील मनसे महिला पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
























