Homeताज्या बातम्यासेवा हक्क दिन उत्साहात साजरा; पारदर्शक व कालमर्यादित सेवांवर भर... नगराध्यक्ष योगेश...

सेवा हक्क दिन उत्साहात साजरा; पारदर्शक व कालमर्यादित सेवांवर भर… नगराध्यक्ष योगेश पाटील

सेवा हक्क दिन उत्साहात साजरा; पारदर्शक व कालमर्यादित सेवांवर भर… नगराध्यक्ष योगेश पाटील
मनमाड (राजेंद्र धिंगाण) – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत नागरिकांना ठराविक कालमर्यादेत शासकीय सेवा मिळण्याचा कायदेशीर हक्क दिला आहे.या कायद्याच्या अंमलबजावणीची जाणीव वाढवण्यासाठी दरवर्षी 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा केला जातो शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 1 एप्रिल 2026 च्या शासन निर्णयानुसार तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या दिनांक 27 एप्रिल 2026 च्या पत्रानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या दशकपूर्ती निमित्त दि. 28 एप्रिल 2026 रोजी “सेवा हक्क दिवस” मनमाड नगर परिषदेत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष  योगेश भाऊ पाटील व उपनगराध्यक्ष  मुकुंद एलिंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेंच नगरपरिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांच्या उपस्थितीत सेवा हक्क दिनानिमित्त शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत नागरिकांना शासनाच्या सेवा पारदर्शक, सुलभ व निश्चित कालमर्यादेत देण्यावर भर देण्यात आला. तसेच “आपलं सरकार” ऑनलाईन पोर्टल, महा-यूएलबी व इतर डिजिटल सेवांद्वारे तक्रारींचा जलद निपटारा करण्याबाबत शासन आदेशाचे पालन करणे व नागरिकांमध्ये जनजागृती करून प्राथमिक सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
या प्रसंगी नगरसेवक तथा शिक्षण समिती सभापती श्री. सुहास जाधव, सामाजिक कार्यकर्ते लोकेश साबळे, कॉम्प्युटर इंजिनिअर हरीश दाडगे, लेखापाल संतोष दराडे, लेखापरीक्षक हरळे साहेब, नगरपरिषद अभियंता अनिल गवळी, कर निरीक्षक पुष्पक निकम, सहाय्यक कर निरीक्षक मनोज मगर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे शपथवाचन व सूत्रसंचालन किरण आहेर यांनी केले. सदर कार्यक्रमा वेळी वसुली, आस्थापना, लेखा, बांधकाम, पाणीपुरवठा व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा हक्क दिनानिमित्त नागरिकांना पारदर्शक, गतिमान व जबाबदार प्रशासन देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

error: Content is protected !!