कॉम्रेड राजू देसले यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान;
लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्यांचा सन्मान करतांना आनंद _ माजी आ. बाळाराम पाटील
केज(प्रतिनिधी) — कामगार, शेतकरी आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत गेली ३५ वर्षे सातत्याने कार्यरत असलेले कॉम्रेड राजू देसले यांना ‘क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ वितरण केज येथे मुक्ताई फंक्शन हॉल संपन्न झाले. क्रांतिसिंह नाना पाटील विकास प्रतिष्ठान, केज (जि. बीड) यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात , ३ ऑगस्ट २०२६ रोजी केज येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे व क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील जयंती व शेतकरी कामगार पक्ष वर्धापनदिनी माजी आमदार भाई बाळाराम पाटील शेकपच, अलिबाग नगरपालिका उप नगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे शेकाप, कॉम्रेड भाऊराव प्रभाळे , ॲड कॉम्रेड पंकज चव्हाण ,
कार्यक्रमांचे आयोजक क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई मोहन गुंड आदी मान्यवर उपस्थित होते. कॉम्रेड राजू देसले यांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल देऊन क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील पुरस्कार माजी आमदार भाई बाळाराम पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.
माजी आ. बाळाराम पाटील यांनी आज क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील पुरस्कार प्रदान करतांना आनंद होत आहे. पुरस्कारार्थी हे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे व क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील यांचे विचार व कार्य वारसा पुढे नेत आहेत. रस्त्यावर उतरून शेतकरी, कामगार , असंघटित कामगार, योजना कर्मचारी ना न्याय मिळून देत आहेत. मार्क्सवादी विचार अन्याय, विषमतावादी व्यवस्था विरोधात लढायला बळ देत असतो. दिल्ली विद्यार्थी आंदोलन सुद्धा लाल बावटा विचाराचे विद्यार्थी संघटना लढल्या याचा आनंद आहे. आज शेतकरी, विद्यार्थी, कामगार समस्या सोडवण्यासाठी लाल बावटा चळवळ मजबूत करावी असे आवाहन केले. शेतकरी कामगार पक्ष येणाऱ्या काळात शेतकरी, जनतेच्या प्रश्नावर लढा उभारेल त्याला साथ द्या असे आवाहन केले. उप नगराध्यक्ष मानसी म्हात्रे यांनी शेकाप इतिहास सांगत महिलांनी नेतृत्वात व चळवळीत सक्रिय होण्याचे आवाहन केले. कॉम्रेड राजू देसले यांनी पुरस्कार क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील यांच्या नावाने दिला याचा आनंद आहे. नाना पाटील ज्या किसान सभा चे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्या किसान सभा साठी शेतकरी वर्गासाठी व आयटक वतीने कामगार साठी काम करत आहेत . मार्क्स विचार लढण्यासाठी बळ देतो. हा पुरस्काराने जबाबदारी अधिक वाढली आहे येणाऱ्या काळात श्रमिकांच्या चळवळी मजबूत करण्यासाठी अधिक जोमाने काम करेल. लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे व क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील यांचे स्वप्न जातीविहीन व वर्गविहीन समाज निर्माण करण्यासाठी काम करेल. कार्यक्रम आयोजकांचे आभार मानले. कॉम्रेड राजू देसले यांचा परिचय कार्यक्रमांचे प्रास्ताविक करतांना भाई मोहन गुंड क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील शेतकरी प्रतिष्ठान व शेकाप नेते यांनी करून दिला.
कॉम्रेड प्रकाश (राजू) देसले यांनी एम.ए. (मराठी), बी.ए. (मानसशास्त्र), बी.एड. तसेच पत्रकारिता विषयातील डिप्लोमा शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी एच.पी.टी. ज्युनिअर कॉलेजमध्ये सीएचबी तत्त्वावर आठ वर्षे अध्यापन केले असून, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमासाठीही अध्यापन केले आहे.
वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) मधून त्यांनी सामाजिक चळवळीतील कार्यास प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण आणि प्राध्यापक होण्याची संधी बाजूला ठेवून असंघटित कामगार, आशा गटप्रवर्तक, अंशकालीन स्त्री परिचर, घरकामगार (मोलकरीण), बांधकाम कामगार, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आदी विविध घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी गेली ३५ वर्षे सातत्याने संघर्ष केला आहे.

आयटकच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर कामगार चळवळ उभी करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच समृद्धी महामार्गग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. शेतकरी संप, कर्जमुक्ती आंदोलन आणि विविध शेतकरी संघर्षांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
विद्यार्थी चळवळीत कार्यरत असताना आंदोलनादरम्यान त्यांना १५ दिवसांचा तुरुंगवासही भोगावा लागला होता. सामाजिक न्याय, कामगार हक्क आणि शेतकरी प्रश्नांबाबत त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.
सध्या कॉम्रेड राजू देसले हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (महाराष्ट्र) राज्य सहसचिव, आयटक महाराष्ट्र राज्य सचिव, किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना (आयटक) राज्याध्यक्ष, अंशकालीन स्त्री परिचर संघटना (आयटक) राज्य सचिव, ईपीएफ पेन्शनर्स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन, कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाचे विश्वस्त, तसेच नाशिक जिल्हा बँक वाचवा–सहकार वाचवा चळवळ आणि संविधान प्रेमी नाशिककर चळवळीचे निमंत्रक म्हणून कार्यरत आहेत.
क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील यांच्या सामाजिक, राजकीय, कामगार आणि शेतकरी चळवळीचा वारसा पुढे नेणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी कॉम्रेड राजू देसले हे एक असल्याने त्यांना हा पुरस्कार प्रधान आनंद होत असल्याची भावना प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केली. या प्रसंगी प्रा. राजकुमार कदम, भीमा विलास नलावडे आदि मान्यवर उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख




























