Homeताज्या बातम्यामनमाडमध्ये मद्यधुंद ट्रक चालकाचा थरार; ६ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

मनमाडमध्ये मद्यधुंद ट्रक चालकाचा थरार; ६ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

मनमाड (प्रतिनिधी): – मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे या कमालीच्या वर्दळीच्या महामार्गावर आज एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली. एका मद्यधुंद ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील भरधाव ट्रक निष्काळजीपणे चालवून रस्ता ओलांडणारे पादचारी आणि समोरून येणाऱ्या दोन ते तीन वाहनांना जोरात धडक दिली. या भीषण अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.या ट्रकचालकाला अटक करण्यात आली असुन त्याच्यावर विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          मिळालेल्या माहितीनुसार, इंदूर-पुणे हायवेवरून एक मोठा ट्रक अत्यंत भरधाव वेगाने मनमाड शहराच्या दिशेने येत होता. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यावरील २ ते ३ वाहनांना जोरदार धडक दिली. एवढ्यावरच न थांबता या अनियंत्रित ट्रकने रस्त्यावरून जाणाऱ्या निष्पाप पादचाऱ्यांनाही चिरडले. अपघाताचा आवाज आणि नागरिकांचा आक्रोश ऐकून परिसरात एकच खळबळ उडाली.हा अपघात घडल्यानंतर घाबरलेला ट्रक चालक घटनास्थळावरून ट्रकसह पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, रस्त्यावरील संतप्त नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी मोठ्या धाडसाने ट्रकचा थरारक पाठलाग केला. नागरिकांनी ट्रक अडवून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाला खाली उतरवले आणि मेाकाट चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. वैद्यकीय तपासणीत चालक अतिप्रमाणात दारू प्यायल्याचे समोर आले आहे.
वाहतूक विस्कळीत, जखमींवर उपचार सुरू
या भीषण अपघातामुळे इंदूर-पुणे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल काही तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक पूर्ववत केली. जखमींना तातडीने जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमी असलेल्या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न

0
मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न ​मनमाड (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मनमाड शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि देशप्रेमाच्या रंगात न्हालेली एक भव्य...

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार...

0
नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र ​नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध...

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...

error: Content is protected !!