Homeताज्या बातम्यामनमाड येथे कट लागल्याच्या किरकोळ वादातून दुचाकीस्वारावर चाकू हल्ला; थरारक घटना सीसीटीव्हीत...

मनमाड येथे कट लागल्याच्या किरकोळ वादातून दुचाकीस्वारावर चाकू हल्ला; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मनमाड(प्रतिनिधी) :- वाहन चालवताना कट लागल्याच्या एका किरकोळ कारणावरून कार चालकाने दुचाकीस्वारावर थेट चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मनमाड शहरात घडली आहे. या भीषण हल्ल्याचा सर्व थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.इरफात बेग असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. इरफात हा आपल्या दुचाकीवरून जात असताना, चोपडा पेट्रोल पंपाजवळ येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारचा त्याच्या दुचाकीला कट लागला. या अपघातानंतर इरफातने कार चालकाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग आल्याने कार चालकाने गाडीतून उतरून थेट चाकू काढला आणि इरफातवर हल्ला करत त्याला भोसकले.
          हल्ला केल्यानंतर आरोपी कार चालकाने घटनास्थळावरून येवल्याच्या दिशेने सुसाट वेगाने पळ काढला. मनमाड पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती येवला पोलिसांना दिली आणि नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. येवला पोलिसांनी संशयास्पद कार अडवण्याचा प्रयत्न केला असता, कार चालकाने थेट पोलिसांच्या अंगावरच वाहन घालण्याचा मुजोरपणा केला. मात्र, पोलिसांनी जीवाची बाजी लावत कार चालकाला जागेवरच दरोडला.पोलिसांनी कार चालक लक्ष्मीकांत शेजवळ याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इरफात बेग याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या त्याच्यावर मालेगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मनमाड शहरात काही काळ प्रचंड खळबळ उडाली होती. पोलीस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न

0
मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न ​मनमाड (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मनमाड शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि देशप्रेमाच्या रंगात न्हालेली एक भव्य...

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार...

0
नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र ​नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध...

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...

error: Content is protected !!