Homeब्रेकिंगमनमाडमध्ये 'महाराजस्व अभियानाचा' फार्स; प्रशासनाकडून शासनाच्या डोळ्यात धूळफेक!

मनमाडमध्ये ‘महाराजस्व अभियानाचा’ फार्स; प्रशासनाकडून शासनाच्या डोळ्यात धूळफेक!

मनमाडमध्ये ‘महाराजस्व अभियानाचा’ फार्स; प्रशासनाकडून शासनाच्या डोळ्यात धूळफेक!

मनमाड(विशेष प्रतिनिधी):शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील सामान्य जनतेला मिळावा, या उदात्त हेतूने राज्यभरात ‘महाराजस्व अभियान’ राबवले जात आहे. मात्र, मनमाड मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे अभियान केवळ एक ‘फॉर्मलिटी’ आणि प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्याचा प्रकार ठरल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. तहसीलदारांपासून ते मंडळ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच या अभियानाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासल्याचा आरोप होत आहे.केवळ शासनाने आदेश दिले म्हणून घाईघाईने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाबाबत कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी करण्यात आलेली नाही याशिवाय ज्या लाभार्थ्यांना लाभ होईल अशा लोकांना तर याबाबत काहीच माहिती नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रसिद्धीचा अभाव आणि नियोजित गुप्तता?    शासकीय नियमांनुसार, कोणत्याही अभियानाची गावपातळीवर दवंडी, सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी करणे अनिवार्य आहे. जेणेकरून गरजू लाभार्थ्यांना त्याची माहिती मिळेल. मात्र, मनमाडमध्ये तहसीलदारांनी आणि संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रसिद्धी टाळल्याचे दिसून येत आहे. अनेक लाभार्थ्यांना अशा प्रकारचे काही अभियान सुरू आहे, याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

पत्रकारांना १० मिनिटे आधी फोन                  प्रशासकीय पारदर्शकतेचा अभाव इतका होता की, गावातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून पत्रकारांचे नंबर मिळवून, कार्यक्रम सुरू होण्याच्या अवघ्या १० मिनिटे आधी तलाठी आणि इतर कर्मचाऱ्यांनी फोन केले. हा सर्व प्रकार म्हणजे केवळ ‘आम्ही कार्यक्रम केला’ असे कागदोपत्री दाखवून वरिष्ठांची आणि शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.

ज्या लाभार्थ्यांच्या कामांसाठी हे अभियान होते, त्यांनाच माहिती नसल्याने त्यांच्याशिवाय  हा ‘शासकीय सोहळा’ पार पडला. लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणे, महिला बचत गट आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग नोंदवणे यांसारख्या महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचनाचे  सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे.एकूणच मनमाडमधील हे महाराजस्व अभियान म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय आणि शासनाच्या डोळ्यात धूळफेक करणारा प्रकार ठरला आहे. आता या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर वरिष्ठ प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न

0
मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न ​मनमाड (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मनमाड शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि देशप्रेमाच्या रंगात न्हालेली एक भव्य...

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार...

0
नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र ​नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध...

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...

error: Content is protected !!