भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मनमाड शहराध्यक्षपदी नाजीम शेख यांची फेरनिवड

मनमाड (प्रतिनिधी): भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे , लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेने मनमाड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी नाजीम अफजल शेख यांची फेरनिवड पक्षश्रेष्टींनीं केल्याचे पत्रक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात नाजीम शेख यांचे घराणे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ म्हणून परिचित आहेत. नाजीम यांचे वडील स्वर्गवासी अफजल भाई शेख हे मनमाड नगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते व काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष होते. स्वर्गीय अफजल भाई शेख हे त्यांच्या संपूर्ण हयातीत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून नांदगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवले त्यांच्या कार्यकाळात नांदगाव तालुक्यात व मनमाड नगरपालिकेत काँग्रेसचे वर्चस्व होते. आपल्या घराण्याच्या संस्कृतीला शोभेल असे कार्य नाजीमभाई यांनी अविरत सुरु ठेवले असून त्यांनी मनमाड नगरपालिकेचे नगरसेवक पदही भूषवले आहे. व मागील दिड ते दोन वर्षांपासून काँग्रेस शहराध्यक्षाची धुरा अत्यंत प्रामाणिकपणे व एकनिष्टतेने सांभाळत आहेत. त्यांनी आपल्या अध्यक्षीय कार्यकाळात अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबविलेले आहेत. कोरोना काळात अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यास त्यांनी प्रशासनाला भाग पाडले आहेत.
सध्या महाराष्ट्रात अनेक सत्ता परिवर्तन झाले अनेकांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. परंतु नाजीमभाई शेख हे कोणत्याही प्रलोभनाला, आमिषाला बळी न पडता काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. आज नाजीमभाई यांची शहराध्यक्षपदी फेरनिवड होणे हि त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठतेची व प्रामाणिकपणाची पोचपावती असल्याचे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. नाजीमभाई शेख यांची शहराध्यक्षपदी फेरनिवड झाल्याचे कळताच त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभासाठी मनमाड शहर ब्लॉक काँग्रेसचे प्रांतिक सदस्य भीमराव जेजुरे , ज्येष्ठ नेते सुनील गवंदे, अकबर शेख, सिद्धार्थ संसारे, राकेश बेदमुथा, ऍड वाल्मिक जगताप, जाहिद शेख, तौसिफ़ तांबोळी, राहत फौंडेशन, नाजीमभाई शेख मित्र परिवार, भारत पेट्रोलियम ट्रान्सपोर्टर, इंडियन ऑइल ट्रान्सपोर्टर, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे कार्याध्यक्ष फिरोजभाई शेख, शफी चाचा, रफिक बाबूजी, ऍड. इस्माईल मुलांनी, सद्दामभाई अत्तार, मतीन मन्सुरी, तसेच रियाजभाई शेख, अकबरभाई शाह, इम्रानभाई शाह, हारून तांबोळी, रशीद पटेल, शकील भाई शेख, जावीद भाई शेख, अब्दुल्लाह शेख, आफताब शेख आदी मित्रपरिवार, हितचिंतक उपस्थित होते. यावेळेस काँग्रेस चे सुनील गवांदे, भीमराव जेजुरे, सिद्धार्थ संसारे, ऍड. वाल्मिक जगताप, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे फिरोज शेख, ऍड. इस्माईल मुलांनी यासह अनेक मान्यवरांचे शुभेच्छापर भाषणे झाली, कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रांतिक सदस्य भीमराव जेजुरे होते सूत्रसंचालन जाहिद शेख यांनी केले.


✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
























