Homeताज्या बातम्याभारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या  मनमाड शहराध्यक्षपदी नाजीम शेख यांची फेरनिवड 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या  मनमाड शहराध्यक्षपदी नाजीम शेख यांची फेरनिवड 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या  मनमाड शहराध्यक्षपदी नाजीम शेख यांची फेरनिवड 
मनमाड (प्रतिनिधी): भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष  मल्लिकार्जुन खर्गे , लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ  यांच्या सूचनेने मनमाड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी नाजीम अफजल शेख यांची फेरनिवड पक्षश्रेष्टींनीं केल्याचे पत्रक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात नाजीम शेख यांचे घराणे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ म्हणून परिचित आहेत. नाजीम यांचे वडील स्वर्गवासी अफजल भाई शेख हे मनमाड नगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते व काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष होते. स्वर्गीय अफजल भाई शेख हे त्यांच्या संपूर्ण हयातीत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून नांदगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवले त्यांच्या कार्यकाळात नांदगाव तालुक्यात व मनमाड नगरपालिकेत काँग्रेसचे वर्चस्व होते. आपल्या घराण्याच्या संस्कृतीला शोभेल असे कार्य नाजीमभाई यांनी अविरत सुरु ठेवले असून त्यांनी मनमाड नगरपालिकेचे नगरसेवक पदही भूषवले आहे. व मागील दिड ते दोन वर्षांपासून काँग्रेस शहराध्यक्षाची धुरा अत्यंत प्रामाणिकपणे व एकनिष्टतेने सांभाळत आहेत. त्यांनी आपल्या अध्यक्षीय कार्यकाळात अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबविलेले आहेत. कोरोना काळात अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यास त्यांनी प्रशासनाला भाग पाडले आहेत.
सध्या महाराष्ट्रात अनेक सत्ता परिवर्तन झाले अनेकांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. परंतु नाजीमभाई शेख हे कोणत्याही प्रलोभनाला, आमिषाला बळी न पडता काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. आज नाजीमभाई यांची शहराध्यक्षपदी फेरनिवड होणे हि त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठतेची व प्रामाणिकपणाची पोचपावती असल्याचे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. नाजीमभाई शेख यांची शहराध्यक्षपदी फेरनिवड झाल्याचे कळताच त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभासाठी मनमाड शहर ब्लॉक काँग्रेसचे प्रांतिक सदस्य भीमराव जेजुरे , ज्येष्ठ नेते सुनील गवंदे, अकबर शेख, सिद्धार्थ संसारे, राकेश बेदमुथा, ऍड वाल्मिक जगताप, जाहिद शेख, तौसिफ़ तांबोळी, राहत फौंडेशन, नाजीमभाई शेख मित्र परिवार, भारत पेट्रोलियम ट्रान्सपोर्टर, इंडियन ऑइल ट्रान्सपोर्टर, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे कार्याध्यक्ष फिरोजभाई शेख, शफी चाचा, रफिक बाबूजी, ऍड. इस्माईल मुलांनी, सद्दामभाई अत्तार, मतीन मन्सुरी, तसेच रियाजभाई शेख, अकबरभाई शाह, इम्रानभाई शाह, हारून तांबोळी, रशीद पटेल, शकील भाई शेख, जावीद भाई शेख, अब्दुल्लाह शेख, आफताब शेख आदी मित्रपरिवार, हितचिंतक उपस्थित होते. यावेळेस काँग्रेस चे सुनील गवांदे, भीमराव जेजुरे, सिद्धार्थ संसारे, ऍड. वाल्मिक जगताप, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे फिरोज शेख, ऍड. इस्माईल मुलांनी यासह अनेक मान्यवरांचे शुभेच्छापर भाषणे झाली, कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रांतिक सदस्य भीमराव जेजुरे होते सूत्रसंचालन जाहिद शेख यांनी केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न

0
मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न ​मनमाड (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मनमाड शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि देशप्रेमाच्या रंगात न्हालेली एक भव्य...

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार...

0
नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र ​नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध...

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...

error: Content is protected !!