Homeब्रेकिंगमनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर

मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज पुन्हा एकदा एक भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. येथील संत बार्णबा शाळेसमोर आयशर ट्रकखाली सापडल्याने एका १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेला पाच वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे मनमाड शहरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. कोमल पगारे असे मृत तरुणीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असेंकी  आज (बुधवारी) पुण्याकडून मालेगावकडे जाणाऱ्या एका आयशर ट्रक (क्रमांक: UP 25 FT 2249) समोर अचानक कोमल पगारे ही तरुणी आली. वाहनचालकाने तातडीने ब्रेक लावून तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र वेगातील ट्रकवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. हा अपघात इतका भीषण होता की, कोमल ही ट्रकखाली तब्बल ५० ते ६० फूट घसरत गेली. गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.अपघाताच्या वेळी कोमलसोबत असलेला पाच वर्षांचा लहान बालकही गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि तातडीने मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी जखमी बालकाला तात्काळ मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच मनमाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि वाहतूक कोंडी सुरळीत केली.

**महामार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’, नागरिकांचा संताप**
हा महामार्ग सध्या वाहनधारकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. अपघात घडलेल्या भागात संत बार्णबा शाळा असून विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची येथे सतत वर्दळ असते. या परिसरात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटीने (NHAI) त्वरित गतिरोधक (स्पीड ब्रेकर्स) बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आक्रमकपणे केली आहे. “नॅशनल हायवे अथॉरिटी अजून किती निष्पाप नागरिकांचे बळी घेणार?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

ट्रिगर वन चे प्रतिबिंब प्रशासकीय अहवालात उमटणे आवश्यक – महेंद्र बोरसे

0
. ट्रिगर वन चे प्रतिबिंब प्रशासकीय अहवालात उमटणे आवश्यक - महेंद्र बोरसे नाशिक(प्रतिनिधी):- केंद्र सरकारच्या दुष्काळ संहिता नियमांनुसार,खरीप हंगामातील दुष्काळाची अंतिम आणि कायदेशीर घोषणा होणे बाकी...

error: Content is protected !!