Homeताज्या बातम्यानांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी

​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या सुनावणीसाठी आलेल्या तक्रारदाराला व त्यांच्या मुलाला जुन्या वादातून शिवीगाळ करत दगडाने व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.यातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असूनही यातील दोन आरोपी फरार आहेत.
​
​           याबाबत अधिक वृत्त असेंकी  १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १:३० ते २:०० वाजण्याच्या सुमारास नागापूर (ता. नांदगाव) येथील रहिवासी व  सरपंच राजेंद्र सयाजी पवार (वय ५४) हे आपल्या मुलांसह भूमी अभिलेख कार्यालयात आलेल्या नोटीसच्या सुनावणीसाठी गेले होते. तेथे उपस्थित असलेल्या संशयित आरोपींनी पूर्ववैमनस्यातून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.  या मारहाणीदरम्यान संशयित रघुनाथ काळू सोमासे याने दगड उचलून तक्रारदाराचा मुलगा पवन पवार याच्या डोक्यात मारल्याने तो गंभीर जखमी झाला. तसेच ‘तू सरपंच झाला म्हणून खूप माजला आहेस, तुझा बेतच पाहतो’ अशी धमकी देऊन दमदाटी करण्यात आली. जखमी पवन यास उपचारासाठी तातडीने नांदगाव येथील सरकारी दवाखान्यात करण्यात आले, तेथून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलवण्यात आले आहे.  या प्रकरणी राजेंद्र पवार यांच्या तक्रारीवरून नांदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  यात १. रघुनाथ काळू सोमासे २. सागर रघुनाथ सोमासे ३. प्रवीण रघुनाथ सोमासे ४. सागर अशोक पवार ५. राजाराम काळू सोमासे (सर्व रा. नागापूर, ता. नांदगाव)  यांच्याविरोधात बीएनएस कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९०, १९१(२) आणि ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन  पोलीस कारवाईदरम्यान रघुनाथ काळू सोमासे, सागर रघुनाथ सोमासे आणि सागर अशोक पवार या तीन आरोपींना अटक करून ९ ऑक्टोबर २०२६ रोजी नांदगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणातील इतर दोन आरोपी प्रवीण रघुनाथ सोमासे आणि राजाराम काळू सोमासे हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार मुदस्सर अल्लाउद्दीन शेख करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

ट्रिगर वन चे प्रतिबिंब प्रशासकीय अहवालात उमटणे आवश्यक – महेंद्र बोरसे

0
. ट्रिगर वन चे प्रतिबिंब प्रशासकीय अहवालात उमटणे आवश्यक - महेंद्र बोरसे नाशिक(प्रतिनिधी):- केंद्र सरकारच्या दुष्काळ संहिता नियमांनुसार,खरीप हंगामातील दुष्काळाची अंतिम आणि कायदेशीर घोषणा होणे बाकी...

error: Content is protected !!