तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड
मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे) तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व जिल्हा क्रीडा परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत येथील सेंट झेव्हियर्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची लुटालूट केली. या यशासह शाळेच्या अनेक खेळाडूंनी पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले आहे.
स्पर्धेत १४ वर्षांखालील (U-14) आणि १७ वर्षांखालील (U-17) मुलगे व मुलींच्या विविध गटांत विद्यार्थ्यांनी बजावलेली कामगिरी खालीलप्रमाणे :
१४ वर्षांखालील (U-14) मुले :
– पियुष मोहन अहिरे : १०० मी. धावणे (प्रथम), थाळीफेक (द्वितीय)
– चैतन्य दशरथ खंबाइत : उंच उडी (प्रथम), लांब उडी (द्वितीय), २०० मी. धावणे (तृतीय)
– सार्थक अशोक देवकर :४०० मी. धावणे (द्वितीय), १०० मी. धावणे (तृतीय)
– भावेश लक्ष्मण बंगाळ : उंच उडी (तृतीय)
– गणेश कैलास जाधव :गोळाफेक (तृतीय)
१७ वर्षांखालील (U-17) मुले :
– तेजस लहानु सदगीर : लांब उडी (प्रथम), उंच उडी (प्रथम)
– साई संदीप उगले : भालाफेक (प्रथम)
– साई चंद्रकांत चुंबळकर :थाळीफेक (प्रथम)
– अलोक अमोल लंकेश्वर :२०० मी. धावणे (द्वितीय)
– उदय मधुकर निपुंगळे :८०० मी. धावणे (द्वितीय)
– आदर्श संजीव ढोणे : १५०० मी. धावणे (द्वितीय)
– किरण शिवाजी खांडवी :उंच उडी (द्वितीय)
– रोशन बाबासाहेब निकम : थाळीफेक (द्वितीय)
– कृष्ण भास्कर बेदाडे :भालाफेक (द्वितीय)
– मनीष परशुराम कांबळी :४०० मी. धावणे (तृतीय)
१४ वर्षांखालील (U-14) मुली :
– विधीका नामदेव पठाडे :६०० मी. धावणे (प्रथम), १०० मी. धावणे (तृतीय)
दिव्या भाऊराव शिंदे : थाळीफेक (प्रथम)
१७ वर्षांखालील (U-17) मुली :
– मिसबा इमरान शेख : ४०० मी. धावणे (प्रथम), थाळीफेक (तृतीय)
– समृद्धी रावसाहेब नाईकवाडे : थाळीफेक (प्रथम)
– मोहिनी बापू जगताप :भालाफेक (प्रथम)
– अमृता अशोक जगताप : १०० मी. धावणे (द्वितीय), २०० मी. धावणे (तृतीय)
– सुप्रिया धनराज सानप :भालाफेक (द्वितीय)
– आर्या कृष्णा झाल्टे : १०० मी. धावणे (तृतीय)

यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक परविंदरसिंग रिसम,विशाल झाल्टे, दत्तू जाधव व स्वप्निल बाकळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.खेळाडूंच्या या दैदीप्यमान यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, पर्यवेक्षक अनिल निकाळे, फादर विवेक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विजयी खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले आणि आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सेंट झेव्हियर्स हायस्कूलच्या या यशामुळे मनमाड शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख




























