Homeताज्या बातम्याभारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद' हॉलवर नवीन ॲक्रेलिक बोर्ड लावा; मनमाड पालिकेकडे...

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद’ हॉलवर नवीन ॲक्रेलिक बोर्ड लावा; मनमाड पालिकेकडे विचार मंचची मागणी

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद’ हॉलवर नवीन ॲक्रेलिक बोर्ड लावा; मनमाड पालिकेकडे विचार मंचची मागणी
मनमाड(प्रतिनिधी): – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद हॉलचे नाव पुसट झाले असून, त्या ठिकाणी तातडीने नवीन आकर्षक ॲक्रेलिक बोर्ड बसवावा, अशी मागणी फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचार मंचच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी मनमाड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.याआधीही अनेकदा त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे मात्र मुख्याधिकारी यांना मौलाना अबुल कलाम आझाद यांची एलर्जी आहे का..? असा संतप्त सवाल देखील फिरोज शेख यांनी विचारला आहे क्षुल्लक कामासाठी जर तुम्हाला दोन दोन वेळा स्मरण पत्र द्यावे लागत असेल तर आम्हाला पालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असाही इशारा फिरोज शेख यांनी दिला आहे.
           याबाबत सविस्तर माहिती अशी की  मनमाड येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद हॉल ही शहरातील एक महत्त्वाची वास्तू आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या हॉलवरील नावाचा बोर्ड खराब झाला असून अक्षरे पुसट झाली आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना हॉलचे नाव ओळखणे कठीण होत आहे.विशेष म्हणजे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही वास्तू असुन तिची अवस्थाही अत्यंत दुरवस्था झालेली आहे याबाबत अनेकदा पालिकेच्या मुख्याधिकारी यांना पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रावर कारवाई करावी यासाठी पून्हा स्मरण पत्र देऊनही कारवाई होत नसेल म्हणजे मुख्याधिकारी किंवा पालिकेच्या लोकप्रतिनिधीना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची एलर्जी आहे का..? असा संशय आम्हाला येत आहे हे पत्र देऊन आठ दिवसांच्या आत जर कारवाई झाली नाही तर 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आझाद हॉलवर चढून लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशाराही फिरोज शेख यांच्या तर्फे देण्यात आला आहे. मंचच्या वतीने दिलेल्या निवेदनात हॉलवर नवीन ‘ॲक्रेलिक’ नावाचा बोर्ड बसवण्यात यावा.रात्रीच्या वेळी हा बोर्ड ठळकपणे दिसावा यासाठी त्यावर सुंदर लायटिंगची (प्रकाश व्यवस्था) सोय करावी.शहराच्या मध्यभागी असलेल्या या वास्तूचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत आशा मागण्या आहेत यापूर्वी २० ऑगस्ट २०२५ रोजी देखील या विषयावर पत्र देण्यात आले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने विचार मंचने पुन्हा एकदा ‘स्मरण पत्र’ देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या हॉलची दुरवस्था थांबवून त्वरित नवीन बोर्ड लावण्यात यावा, अशी आग्रही विनंती फिरोज शेख यांनी केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!