Homeब्रेकिंगमनमाड नगरपरिषदेच्या बेकायदेशीर अतिक्रमण कारवाईची चौकशी होणार; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर चौकशी समिती गठीत

मनमाड नगरपरिषदेच्या बेकायदेशीर अतिक्रमण कारवाईची चौकशी होणार; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर चौकशी समिती गठीत

मनमाड नगरपरिषदेच्या बेकायदेशीर अतिक्रमण कारवाईची चौकशी होणार; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर चौकशी समिती गठीत
 
​मनमाड(प्रतिनिधी):- मनमाड नगरपरिषदेमार्फत १ व २ जून २०२६ रोजी शहरात राबवण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईच्या चौकशीसाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चौकशी समितीची स्थापना केली आहे. भाजप नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दीपक गोगड यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री सचिवालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.यामुळे शहरात खळबळ उडाली असुन शहरातील अतिक्रमण काढतांना दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप सत्ताधारी गटातील नगरसेवक अमजद पठाण, राकेश ललवाणी यांनी सर्वसाधारण सभेत बोलून दाखवत यावरून मोठे वादळ उभे केले होते त्यानंतर 15 ऑगस्ट नंतर शहरातील इतर अतिक्रमण काढण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी दिले होते.
         मनमाड नगरपरिषदेने नियमबाह्य व बेकायदेशीर पद्धतीने मालेगाव चौफुली व इतर परिसरातील खाजगी मालकीच्या मिळकतींवर तसेच दुकानदारांवर हातोडा चालवून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान केले, असा आरोप दीपक गोगड यांनी केला होता. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरपरिषदेस तीन वेळा ‘कारण दाखवा’ नोटीस बजावूनही कोणताही खुलासा न मिळाल्याने, गोगड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता.त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवांनी
​चौकशी समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी जिल्हा सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) श्याम विठ्ठल गोसावी यांच्या देखरेख व मार्गदर्शनाखाली ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.या चौकशी समितीने सात दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.
७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
सदर चौकशी समितीने मनमाड नगरपरिषद हद्दीतील तक्रार अर्जानुसार प्रत्यक्ष जागेवरील अतिक्रमण कारवाईची सखोल चौकशी करून आपला स्वयंस्पष्ट अहवाल ७ दिवसांच्या आत सादर करावा, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना या समितीला आवश्यक ते सर्व दस्तऐवज व माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 असे आहेत चौकशी समितीचे पद
१ यशवंत पाटील (कार्यकारी अभियंता, नगरपरिषद प्रशासन, नाशिक)अध्यक्ष
२ निनाद जगताप (रचना सहाय्यक, सिन्नर नगरपरिषद)सदस्य
३ मुकुंद शिंदे (लेखापाल/लेखापरीक्षक, निफाड नगरपरिषद)सदस्य
४ दुर्गेश गुजराथी (स्थापत्य अभियंता, नगरपरिषद प्रशासन, नाशिक)सदस्य सचिव
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न

0
मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न ​मनमाड (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मनमाड शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि देशप्रेमाच्या रंगात न्हालेली एक भव्य...

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार...

0
नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र ​नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध...

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...

error: Content is protected !!