आगामी विधानसभा निवडणुकीत वंचीतचे पंचविस तीस आमदार निवडून द्या : डॉ चित्रा कुऱ्हे
मनमाड येथे वंचित बहुजन आघाडीच्या शहर संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन संपन्न
मनमाड(प्रतिनिधी):- सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी व त्यांना संविधाना प्रमाणे वागणूक।मिळावी त्यांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे किमान 25 ते 30 आमदार निवडून द्या व प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करा भविष्यात मनमाड शहरात देखील आपलाच नगराध्यक्ष बसेल यासाठी प्रयत्न करा असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक जिल्हा प्रभारी डॉ चित्राताई कुऱ्हे यांनी व्यक्त केले सम्राट अशोक विजयादशमीच्या निमित्ताने मनमाड शहर व परिसरातील जनतेच्या सेवेसाठी ‘वंचित बहुजन आघाडी’च्या मनमाड शहर संपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला.यावेळी त्या बोलत होत्या नगीना कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या या सोहळ्याचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्या व नाशिक जिल्हा निरीक्षक डॉ. चित्राताई कुऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि जनहिताच्या कामांना गती देण्यासाठी पक्ष सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.यावेळी डॉ चित्राताई कुऱ्हे यांनी आपले मत मांडताना म्हणाल्या ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाला अधिक बळ देण्यासाठी आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीचे कार्य तळमळीने पुढे नेण्याचा संकल्प करूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आणि तत्वांवर निष्ठा ठेवून आपण कार्य केले पाहिजे. सध्या केंद्र आणि राज्य सरकार खोटा नरेटिव्ह उभा करून राज्यातील जनतेची आणि माता-भगिनींची फसवणूक करत आहेत. हा खोटेपणा ओळखून आपण जनतेला सावध केले पाहिजे.”असे मत व्यक्त केले
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा पूर्व अध्यक्ष दिपक पवार, मनमाडचे नगराध्यक्ष शिवसेनेचे योगेश पाटील तसेच मनमाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे मनमाड शहराध्यक्ष विलास आहिरे यांनी केले होते.सदर प्रसंगी , जिल्हा महासचिव संजय जगताप,युवा जिल्हाध्यक्ष शशिकांत पवार, ऍड.अनिल कुऱ्हे, ऍड नितेश हिरे, जिल्हा सचिव कादिर शेख,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप खरे,पुरुषोत्तम सव्वाखंडे, बाबा साळवे मनमाड शहर कार्यकारिणीचे काकासाहेब भालेराव, अमोल केदारे,निलेश निकम, सागर गाडे,राकेश पगारे,मनोज जगताप, रोहित संसारे,अनिल कांबळे,रुपेश जाधव, सौरव डोळस, सोमनाथ मोरे,किरण पगारे, मनीष गोरे,यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे,यांनी तर आभार जिल्हा उपाध्यक्ष ऍड. आम्रपाली निकम यांनी मानले,याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,महिला मंडळ, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष हे प्रमुख अतिथी…?
वंचित बहुजन आघाडी ही भाजपा शिवसेना यासारख्या हिंदुत्ववादी विचार सरणी असलेल्या समविचारी पक्षाच्या विरोधात आहे स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांचे धोरण ठरलेले आहे ते आजपर्यंत एकही हिंदुत्ववादी पक्षासोबत गेलेले नाही किंवा त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झालेले नाहीत मात्र मनमाड शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला मनमाडचे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष योगेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या व राजकीय वर्तुळात देखील चर्चा सुरू होती..

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख

































