Homeताज्या बातम्यामनमाड नगर पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची...

मनमाड नगर पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना, सुरक्षा रक्षकही बेपत्ता मनमाड:

मनमाड नगर पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना, सुरक्षा रक्षकही बेपत्ता
मनमाड(प्रतिनिधी):-मनमाड नगर पालिकेच्या स्वच्छता विभागाचा अत्यंत ढिसाळ आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरातील रेल्वे स्टेशनसमोरील अत्यंत गजबजलेल्या भागात असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची कमालीची दुरवस्था झाली असून, पालिकेच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.आज गुरुकुमार निकाळे आणि प्रवीण पगारे यांनी या ठिकाणी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता केली आणि पालिकेचा निषेध केला.
स्वच्छतेचे दावे फक्त कागदावरच!
मनमाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष हे रोज शहराच्या स्वच्छतेबाबत आढावा बैठका घेतात. शहरात कशी चकाचक स्वच्छता सुरू आहे, याचे दावे पालिका प्रशासनाकडून रोज केले जातात. मात्र, हे सर्व दावे किती फोल आहेत, हे रेल्वे स्टेशनसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अवस्था पाहून स्पष्ट होते. महापुरुषांच्या या पुतळ्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि घाण साचली आहे. रोज बैठकांचे गुऱ्हाळ दळणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना या पुतळ्याच्या स्वच्छतेचा मात्र विसर पडला आहे. 
सुरक्षा रक्षकही गायब, सुरक्षेचा बोजवारा
महापुरुषांच्या पुतळ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असताना, या ठिकाणी पालिकेकडून नियुक्त केलेले सुरक्षा रक्षकही गायब असल्याचे पाहायला मिळत आहे. पुतळा परिसरात एकही सुरक्षा रक्षक उपलब्ध नसल्याने या जागेची सुरक्षा वाऱ्यावर सोडली गेली आहे. यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 
नागरिक आणि आंबेडकरी अनुयायांमध्ये तीव्र संताप
लाखो अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची अशी दुरवस्था होणे, ही पालिका प्रशासनाची मोठी घोडचूक मानली जात आहे. पालिकेचा स्वच्छता विभाग नेमके काय काम करतोय? अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष का नाही? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. पालिका प्रशासनाने या भोंगळ कारभारातून बाहेर पडून तात्काळ पुतळा परिसराची स्वच्छता करावी आणि २४ तास सुरक्षेसाठी रक्षक तैनात करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिक आणि आंबेडकरी अनुयायांनी दिला आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा

0
​मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा   https://youtu.be/lWGHCZcM6hM?si=HlmNgTLY6Z4WBBHG ​मनमाड(प्रतिनिधी ):- मनमाड शहरात एका मद्यधुंद ट्रक चालकाने प्रचंड धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना...

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

error: Content is protected !!