Homeताज्या बातम्यामनमाडच्या गांजा प्रकरणात पतीला अडकवल्याचा महिलेचा आरोप; गृहमंत्र्यांकडे धाव घेत आंदोलनाचा दिला...

मनमाडच्या गांजा प्रकरणात पतीला अडकवल्याचा महिलेचा आरोप; गृहमंत्र्यांकडे धाव घेत आंदोलनाचा दिला इशारा

मनमाडच्या गांजा प्रकरणात पतीला अडकवल्याचा महिलेचा आरोप; गृहमंत्र्यांकडे धाव घेत आंदोलनाचा दिला इशारा
मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गांजा विक्रीच्या प्रकरणात आपल्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप एका महिलेने केला आहे. या प्रकरणी मनमाड पोलिसांनी गांजा ठेवणाऱ्या दोन जणांना अटक केली असली तरी मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना पाठीशी घातले जात असून, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी पीडित महिलेने थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.कल्पना बाळू भोसले असे तक्रारदार महिलेचे नाव असुन या प्रकरणी आरोपींना राजकीय आश्रय मिळत असल्याचे महिलेनं तक्रारी अर्जात म्हटले आहे.
              याबाबत सविस्तर वृत्त असे की भारत नगर, मनमाड येथील रहिवासी सौ. कल्पना बाळू भोसले यांनी हा तक्रार अर्ज दिला आहे. अर्जातील माहितीनुसार, त्यांचे पती बाळू वामन भोसले यांच्यावर मनमाड शहर पोलीस ठाण्यात गांजा विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, विकास पोपट शिंदे आणि गोगा सांगळे यांनी बाळू भोसले यांना अडकवण्यासाठी गांजा ठेवल्याचे निष्पन्न झाले  आणि पोलिसांनी या दोघांना अटकही केली त्यांनी कबुली जबाब दिला असुन त्यात शहरातील काही राजकीय नेत्यांची नाव आली आहेत  कल्पना भोसले यांनी अर्जात नमूद केले आहे की, या संपूर्ण कटाचे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि कोणाच्या सांगण्यावरून हा गांजा ठेवण्यात आला, हे शहरात सर्वश्रुत आहे. मात्र, पोलीस प्रशासन या मुख्य सूत्रधारांना अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजकीय दबावापोटी मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.या तक्रार अर्जाच्या प्रती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (मालेगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी (मनमाड) आणि मनमाड शहर पोलीस निरीक्षकांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता या प्रकरणावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्य सुत्रधाराना अटक करा अन्यथा आंदोलन 
या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध जवळपास लागला आहे आणि यातील मुख्य सूत्रधार हे मोकाट फिरत असुन ते राजकीय दबावाचा वापर करत आहे याउलट ते सोशल मीडियावर स्टेट्स टाकून प्रशासन आमचं काहीच वाकड करू शकत नाही असे दावे करत आहे त्यामुळे पोलिसांनी आशा गुन्हेगारी स्वरूपाच्या नेत्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करावी, जर या प्रकरणावर लवकरात लवकर ठोस कारवाई झाली नाही, तर आपल्या कुटुंबासह लोकशाही मार्गाने आंदोलन करू
कल्पना बाळू भोसले, तक्रारदार महिला
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!