मनमाड रेल्वे स्थानकावर ‘अमृत भारत एक्सप्रेस’चे ऐतिहासिक स्वागत; बनारस-पुणे विशेष गाडीचा आज लोकार्पण सोहळा
मनमाड(अजहर शेख):- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत येत असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकावर आज एका ऐतिहासिक क्षणाचे आयोजन करण्यात आले होते . बनारस ते पुणे (हडपसर) दरम्यान धावणाऱ्या ‘अमृत भारत एक्सप्रेस’ या नवीन विशेष उद्घाटन गाडीचा लोकार्पण सोहळा आज, २९ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे सर यांच्या हस्ते पार पडला रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा भाग असलेल्या या ‘अमृत भारत’ गाडीमुळे उत्तर भारत आणि महाराष्ट्र यांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. या विशेष कार्यक्रमात आज शालेय विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले तर शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनीनी उत्कृष्ट कला सादर केल्या.या विद्यार्थ्यांचा खासदार भास्कर भगरे सर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हीजन मधील महत्वपूर्ण स्थानक असलेले मनमाड जंक्शन स्थानकावर हा भव्य सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या सूरवातीला शालेय विद्यार्थ्यांनी विविध लोककला सादर केल्या यानंतर रेल्वेचे अधिकारी यांनी आजच्या या बनारस पुणे या अमृत भारत गाडीची माहिती दिली यावेळी मंचावर खासदार भास्कर भगरे, सिनियर डी ई एन विशाल गरड डी सी एम बी बी तपस्वी हे उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला स्वागत समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम आटोपल्यावर प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर या नवीन अमृत भारत रेल्वेचे स्वागत करण्यात आले खासदार भास्कर भगरे व इतर मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले
उत्तर भारतीय प्रवाशांसाठी मोठी पर्वणी..!
ही विशेष गाडी बनारस आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणार आहे. यामुळे भाविक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. मनमाड हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन असल्याने, या ठिकाणी होणारा हा सोहळा रेल्वे प्रवासी आणि स्थानिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.उत्तर भारतीय काम तसेच शिक्षणानिमित्ताने महाराष्ट्र भर प्रवास करत असतात त्यांच्यासाठी ही गाडी म्हणजे विशेष पर्वणी ठरणार आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख

































