Homeताज्या बातम्याडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमित निवासस्थान नियमानुकुल होणार ; ...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमित निवासस्थान नियमानुकुल होणार ;  योगेश पाटील

मनमाड(राजेंद्र धिंगाण) : महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार १ जानेवारी २०११ पर्यंत अस्तित्वात असलेल्या अतिक्रमित झोपडीधारकांच्या निवासस्थानांना नियमानुकूल करण्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरात महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार मनमाड नगरपरिषद हद्दीतील शासकीय जमिनीवरील अतिक्रमित निवासस्थाने नियमित करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही गतीमान केली आहे.
यासंदर्भात  प्रभाग क्रमांक ४ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील अतिक्रमित घरांचे नियमन करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस मनमाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश  पाटील, उपनगराध्यक्ष व प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक मुकुंद एलिंजे, शिवसेना गटनेता महेंद्र शिरसाठ सामाजिक कार्यकर्ते बाळा सांगळे, मुख्यअधिकारी शेषराव चौधरी, घरकुल योजनेचे प्रतिक परदेशी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सविस्तर चर्चा करून परिसरातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी अर्ज केलेल्या नागरिकांच्या घरांना क्रमांक देण्याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असून, ज्या नागरिकांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांचे अर्ज स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.नगराध्यक्ष योगेश  पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत या प्रक्रियेला गती देण्यावर भर दिला. तसेच स्थानिक रहिवाशांशी समन्वय साधून कोणतीही अडचण न येऊ देता ही कार्यवाही पार पाडण्याचे आदेश दिले.दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील अतिक्रमित घरे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असून, यामुळे अनेक कुटुंबांना अधिकृत हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थैर्य व सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

4-5 मिनिटे वाचवण्यासाठी प्रस्तावित रस्त्यामुळे वेताळ टेकडीला धोका निर्माण झाला आहे

0
पुणे: पुणे महानगरपालिकेने अर्ध्या दशकाहून अधिक काळ प्रस्तावित बालभारती-पौड फाटा रस्ता हा कोंडीत सापडलेल्या शहरी वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा गहाळ दुवा मानला आहे. 2019...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

0
अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

मनमाडमध्ये अतिक्रमण मोहिमेमुळे टपरीधारक संकटात; पर्यायी जागा देण्याची नगरसेवकांची  मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

0
मनमाडमध्ये अतिक्रमण मोहिमेमुळे टपरीधारक संकटात; पर्यायी जागा देण्याची नगरसेवकांची  मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी   मनमाड(प्रतिनिधी) : - मनमाड शहरात नगरपरिषदेच्या वतीने सध्या अतिक्रमण विरोधी मोहीम वेगाने राबवली जात...

नोएडा आयटी फर्म ThynkTech ने पुणे कार्यालय बंद केल्याने 500 बेरोजगार; सीईओला अटक, सरकारी...

0
पुणे: ThynkTech India OPC Ltd चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल ठाकरे - नोएडा-आधारित आयटी फर्म ज्याने 22 एप्रिल रोजी कोणतीही सूचना न...

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: महिलेने धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप केल्यानंतर पुण्याच्या...

0
एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...

error: Content is protected !!