माजी सभापती दीपक गोगड यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 51 हजाराची मदत
मनमाड(प्रतिनिधी):- राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच परिस्तिथीची संवेदनशीलतेणे नोंद घेत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांनी नांदगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. या दौऱ्यात ना.महाजन यांनी ग्रामीण भागातील पिकांची पाहणी केली. सदर दौऱ्यात मनमाड बाजार समितीचे माजी सभापती दिपक गोगड यांनी दुष्काळ काळात शेतकरी बांधवाना सहायता म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस 51000 रुपयांचा धनादेश ना. महाजन यांच्याकडे सुपूर्त केला.

सध्या सप्टेंबर महिना सुरू आहे आणि राज्यात अनेक भागात पाऊस झालेला नाही यामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळाला आदेश दिले असुन सर्व पालकमंत्री व मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात तालुक्यात पाहणी दौरा करून अहवाल सादर करावा यामुळे नाशिकचे पालकमंत्री ना गिरीश महाजन यांनी काल जिल्यात दौरा केला यावेळी त्यांनी नांदगाव तालुक्यातील भार्डी व अस्तगाव या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश केले यावेळी राज्यातून दुष्काळासाठी प्रथमच मुख्यमंत्री सहायता निधीस मनमाड येथील माजी सभापती दीपक गोगड यांनी त्यांचे योगदान नोंदविले.यावेळी त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे 51 हजाराचा धनादेश सुपूर्द केला यावेळी विधान परिषद आमदार गोकुळ गिते, नांदगावचे आमदार सुहास कांदे, भाजप जेष्ठ नेत्या जयश्री दौंड, बाजार समिती सभापती गणेश धात्रक, उपसभापती पुंजाराम आहेर, संचालक योगेश कदम, भाजपा तालुकाध्यक्ष मनीषा काकड, जयकुमार फुलवानी, मुकुंद एळींजे, गिरीश गोगड, आनंद बोथरा आदि उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख






























