Homeताज्या बातम्यानांदगाव तालुक्यात तात्काळ 'कोरडा दुष्काळ' जाहीर करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची...

नांदगाव तालुक्यात तात्काळ ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे जोरदार मागणी

नांदगाव तालुक्यात तात्काळ ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे जोरदार मागणी

​नांदगाव(प्रतिनिधी ):- नांदगाव तालुक्यात या वर्षी पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अल्प पर्जन्यमानामुळे खरीप हंगामातील सर्व पिके जळून खाक झाली असून तालुक्यातील बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर नांदगाव तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन संपूर्ण नांदगाव तालुक्यात कोणत्याही अटी-शर्तींशिवाय तातडीने ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. शिवसेना तालुकाप्रमुख संतोष मधुकर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे निवेदन तहसील कार्यालयात सादर करण्यात आले.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पुरेसा पाऊस न झाल्याने मका, बाजरी, कापूस, सोयाबीन यांसारखी खरीप हंगामातील सर्व मुख्य पिके करपून गेली आहेत. शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्चही वसूल झालेला नाही. विहिरी, बोअरवेल आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत प्रचंड घट झाली आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून जनावरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरडवाहू (जिरायती) मका, बाजरी, सोयाबीन इत्यादी पिकांच्या भरपाईसाठी किमान ५०,०००/- रुपये प्रतिहेक्टरी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत तर बागायती व फळ पिक डाळिंब, कांदा, द्राक्ष यांसारख्या फळबागा पाण्याच्या अभावामुळे वाळल्याने प्रतिहेक्टरी १,०००,०००/- (एक लाख) रुपये विशेष आर्थिक सहाय्य द्यावे.याशिवाय पीक विमा योजनेंतर्गत कोणत्या ही अटी न लावता ‘लोकल कॅलॅमिटी’ व ‘मिड-सीझन ॲडव्हर्सिटी’ नियमांनुसार सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २५% अग्रीम (Advance) भरपाई तातडीने मंजूर करावी. मदतीची २ हेक्टरची अट शिथिल करून नुकसान झालेल्या संपूर्ण क्षेत्राला ही भरपाई लागू करण्यात यावी. शेतकऱ्यांची बँक कर्जे व वीजबिल माफ करून प्रतिहेक्टरी भरीव मदत द्यावी.
तालुक्यात तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात.
​पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची संख्या वाढवावी व रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करावीत असे म्हटले आहे तर नांदगाव तालुक्यातील बिकट परिस्थिती पाहता शासनाने कोणताही विलंब न करता संपूर्ण तालुक्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करावा. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सर्वसामान्य बळीराजाला सोबत घेऊन तालुक्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा सज्जड इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक, तालुकाप्रमुख संतोष गुप्ता,मनमाड शहरप्रमुख माधव शेलार,शैलेश सोनवणे,खालिद शेख,जाफर मीरझा यांच्यासह शेकडो शिवसैनिकांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!