Homeताज्या बातम्याहमाली करणाऱ्या बापाच्या कष्टाला 'खाकी'ची सलामी; जिद्दीच्या जोरावर राजेश्वरी जाधवची पोलीस दलात...

हमाली करणाऱ्या बापाच्या कष्टाला ‘खाकी’ची सलामी; जिद्दीच्या जोरावर राजेश्वरी जाधवची पोलीस दलात निवड

मनमाड(आवेश कुरेशी):- ‘इच्छाशक्ती प्रबळ असेल तर गरिबी कधीच यशाच्या आड येत नाही’, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील राजेश्वरी विजय जाधव हिने सिद्ध करून दाखवले आहे. हमालीचे काम करणाऱ्या वडिलांच्या घामाचे चीज करत राजेश्वरीने पोलीस भरतीत यश संपादन केले असून, तिच्या या यशाने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.माझ्या वडिलांनी काबाडकष्ट करून मला शिकवले आहे आणि त्यांच्या मेहनतीचे चीज व्हावे म्हणून मी खुप कष्ट केले व माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असे मत राजेश्वरीने व्यक्त केले.
          राजेश्वरीचे वडील विजय जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून हमाली करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाचा भार वाहत असताना त्यांनी मुलीच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. हमालीतून मिळणारा कष्टाचा पैसा त्यांनी मुलीच्या स्वप्नांसाठी खर्च केला. वडिलांचे हे अपार कष्ट राजेश्वरी जवळून पाहत होती आणि याच कष्टाचे चीज करण्यासाठी तिने ‘खाकी’ वर्दी मिळवण्याचा निश्चय केला होता.राजेश्वरीने आपल्या ध्येयप्राप्तीसाठ अकॅडमी’मध्ये प्रवेश घेतला. अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली तिने मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी दिवस-रात्र एक केली. अभावाच्या परिस्थितीतही जिद्द न हरता तिने घेतलेल्या मेहनतीमुळे अखेर तिची पोलीस दलात निवड झाली आहे.
सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
एका हमाल बापाच्या मुलीने पोलीस वर्दीला गवसणी घातल्याने समाजातील सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. “मुलीने माझ्या कष्टाचे सोने केले,” अशी भावना व्यक्त करताना विजय जाधव यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते. राजेश्वरीचे हे यश ग्रामीण भागातील आणि आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या अनेक तरुण मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

4-5 मिनिटे वाचवण्यासाठी प्रस्तावित रस्त्यामुळे वेताळ टेकडीला धोका निर्माण झाला आहे

0
पुणे: पुणे महानगरपालिकेने अर्ध्या दशकाहून अधिक काळ प्रस्तावित बालभारती-पौड फाटा रस्ता हा कोंडीत सापडलेल्या शहरी वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा गहाळ दुवा मानला आहे. 2019...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

0
अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

मनमाडमध्ये अतिक्रमण मोहिमेमुळे टपरीधारक संकटात; पर्यायी जागा देण्याची नगरसेवकांची  मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

0
मनमाडमध्ये अतिक्रमण मोहिमेमुळे टपरीधारक संकटात; पर्यायी जागा देण्याची नगरसेवकांची  मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी   मनमाड(प्रतिनिधी) : - मनमाड शहरात नगरपरिषदेच्या वतीने सध्या अतिक्रमण विरोधी मोहीम वेगाने राबवली जात...

नोएडा आयटी फर्म ThynkTech ने पुणे कार्यालय बंद केल्याने 500 बेरोजगार; सीईओला अटक, सरकारी...

0
पुणे: ThynkTech India OPC Ltd चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल ठाकरे - नोएडा-आधारित आयटी फर्म ज्याने 22 एप्रिल रोजी कोणतीही सूचना न...

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: महिलेने धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप केल्यानंतर पुण्याच्या...

0
एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...

error: Content is protected !!