Homeताज्या बातम्यामनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी हक्काची जागा आणि सभागृह उपलब्ध व्हावे, यासाठी ‘राष्ट्रीय चर्मकार महासंघ’ च्या वतीने दिंडोरी लोकसभेचे खासदार  भास्कर भगरे सर यांना निवेदन देऊन विकासकामांसाठी निधी मंजूर करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.  राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष  राजाभाऊ आहेर आणि उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शैलेश प्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन खासदार भगरे यांना सादर करण्यात आले याबाबत सविस्तर चर्चा करून आपल्या निवेदनाबाबतीत सकारात्मक विचार करुन आपल्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन खासदार भगरे यांनी शिष्टमंडळाला दिले.
मनमाड शहर आणि नांदगाव तालुक्यात साधारणतः ५,००० चर्मकार कुटुंबे वास्तव्यास आहेत. हा समाज अत्यंत कष्टकरी असून पारंपरिक व्यवसाय व नोकरी करून आपली उपजीविका चालवतो. धार्मिक, सामाजिक तसेच लहान-मोठे कार्यक्रम एकत्र येऊन करण्यासाठी समाजाकडे स्वतःचे हक्काचे मंदिर किंवा सभागृह उपलब्ध नाही. मनमाड शहर हद्दीत सर्व्हे नं. ३५४/३/४ पैकी १८९१ चौ.मी. क्षेत्र महाराष्ट्रीय चर्मकार संघासाठी उपलब्ध आहे या जागेचा योग्य विनियोग करण्यासाठी तिथे एक भव्य हॉल (सामाजिक सभागृह), काही खोल्यांचे बांधकाम आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी खासदार निधीतून आवश्यक निधी मंजूर करावा, अशी नम्र विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या विकासकामामुळे समाजातील सर्व घटकांना एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबवणे सोपे जाईल आणि समाजाला मोठ पाठबळ मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. निवेदनासोबत सदर जागेचा ८/अ उतारा आणि लेआऊट मॅप देखील जोडण्यात आला आहे.निवेदनावर  राजाभाऊ आहेर महा.उपाध्यक्ष शैलेश प्रकाश सोनवणे
उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष नाना आहेर
मंदिर स.अध्यक् जे डी.वसईत डॉ.सुभाष अहिरे  वनाजी आहेर अशोक  शिलावट महेंद्र अहिरे  विजय धाकराव संजय धाकराव गोपी बडोदे रमेश भदाणे व समाज बांधवाच्या सह्या आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा

0
​मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा   https://youtu.be/lWGHCZcM6hM?si=HlmNgTLY6Z4WBBHG ​मनमाड(प्रतिनिधी ):- मनमाड शहरात एका मद्यधुंद ट्रक चालकाने प्रचंड धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना...

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

error: Content is protected !!