Homeमनमाडमनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती वाहतूक, अपघातांचे प्रमाण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे नांदगाव विधानसभा प्रमुख, माजी नगराध्यक्ष मनमाड तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, मनमाडचे सभापती श्री. गणेश जगन्नाथ धात्रक यांनी आज दि. ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) कार्यकारी अभियंता श्रीमती नेहते मॅडम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत सविस्तर निवेदन दिले.

मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने, मालवाहू वाहने, प्रवासी वाहने तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते. तसेच विविध ठिकाणी वाहतूक कोंडी, रस्त्यालगतची अतिक्रमणे व अपघातप्रवण परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच स्थानिक वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर गणेश जगन्नाथ धात्रक यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड गेट क्र. १ व २ समोर, डोणगाव चौफुली, सोनावाला कॉम्प्लेक्स समोर, तांबोळी कॉम्प्लेक्स समोर तसेच खडकजाई शाळेसमोर आणि बुरुकुलवाडी सुरू होण्यापूर्वी व त्यानंतरच्या परिसरात तातडीने वाहतूक नियंत्रण व रस्ता सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली.

यामध्ये स्पीड ब्रेकर, वेगमर्यादा दर्शविणारे फलक, ब्लिंकर/फ्लॅशर लाईट, स्ट्रीट लाईट, रिफ्लेक्टर, रोड मार्किंग, चेतावणी फलक तसेच आवश्यक त्या इतर रस्ता सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्याची मागणी करण्यात आली. तसेच मनमाड शहरातून जाणाऱ्या महामार्गाची संपूर्ण सुरक्षा ऑडिट करून अपघातप्रवण व धोकादायक ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी वेगनियंत्रणाची प्रभावी व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी श्रीमती नेहते, कार्यकारी अभियंता यांनी मनमाड–चांदवड रोडची लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची व अपघातप्रवण ठिकाणांची योग्य पाहणी करण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

मनमाड शहरातील नागरिकांच्या जीवितासंबंधीचा हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, केवळ अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी अपघात होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे, अशी भूमिका श्री. गणेश जगन्नाथ धात्रक यांनी यावेळी मांडली.

मनमाड–चांदवड महामार्गावरील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या या मागणीमुळे लवकरच आवश्यक रस्ता सुरक्षा उपाययोजना प्रत्यक्षात येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

ट्रिगर वन चे प्रतिबिंब प्रशासकीय अहवालात उमटणे आवश्यक – महेंद्र बोरसे

0
. ट्रिगर वन चे प्रतिबिंब प्रशासकीय अहवालात उमटणे आवश्यक - महेंद्र बोरसे नाशिक(प्रतिनिधी):- केंद्र सरकारच्या दुष्काळ संहिता नियमांनुसार,खरीप हंगामातील दुष्काळाची अंतिम आणि कायदेशीर घोषणा होणे बाकी...

error: Content is protected !!