नांदगांव Archives - MANMAD SAMRAT
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप
नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गटशिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाडे हे आपल्या पदाचा गैरवापर करून विद्यमान आमदार सुहास कांदे आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासाठी थेट ‘स्टार प्रचारक’ म्हणून काम करत असल्याचा गंभीर आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहे. या राजकीय हेतूने प्रेरित कामासाठी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा अमानुष छळ केला जात असून, शिक्षण क्षेत्रातून यावर तीव्र आक्षेप घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गटशिक्षणाधिकारी नाईकवाडे हे तालुक्यातील शिक्षकांवर बळजबरीने राजकीय प्रचार कार्यात सहभागी होण्यासाठी दबाव टाकत आहेत. जे शिक्षक याला नकार देतात किंवा शासकीय नियमांचे पालन करू इच्छितात, त्यांना थेट बदली किंवा निलंबन करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. शासकीय अधिकाऱ्याने अशा प्रकारे राजकीय पक्षाचा अजेंडा राबवणे आणि शिक्षकांना वेठीस धरणे अत्यंत बेकायदेशीर असल्याच्या भावना शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहेत.दुसरीकडे, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (दप्तर व वह्या) वाटप करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. मात्र, या मोफत साहित्यावर आणि वह्यांवर थेट आमदार सुहास कांदे यांचे फोटो आणि त्यांच्या राजकीय पक्षाचे चिन्ह छापण्यात आले आहे. शासकीय किंवा निमशासकीय शाळांमधील निष्पाप विद्यार्थ्यांचा वापर अशा प्रकारे राजकीय जाहिरातबाजी आणि पक्षाच्या प्रचारासाठी करणे हे शिक्षण विभागाच्या नियमांचे सरळ-सरळ उल्लंघन आहे. सोशल मीडियावर स्वतः आमदार आणि त्यांच्या समर्थकांकडून या कार्यक्रमांचे फोटो व वेळापत्रक उघडपणे शेअर केले जात आहेत, ज्यामुळे या आरोपांना बळकटी मिळत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांवरील आरोपांची मालिका एवढ्यावरच थांबत नाही. शालेय शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत प्रशिक्षण कालावधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार (भ्रष्टाचार) झाल्याचा आरोप अनेक शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे. शिक्षकांच्या भत्त्यांमध्ये आणि प्रशिक्षणाच्या सोयी-सुविधांमध्ये कपात करून लाखो रुपयांचा निधी लाटल्याची तक्रार वरिष्ठ पातळीवर करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, नाशिक हा जिल्हा राज्याच्या शिक्षणमंत्र्यांचा गृहजिल्हा मानला जातो. तसेच दादा भुसे यांच्या मतदारसंघाला लागूनच असलेल्या या नांदगाव तालुक्यात शिक्षण विभागाचा असा उघड आणि भोंगळ कारभार सुरू आहे. एवढ्या तक्रारी होऊनही संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने, त्यांना बड्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचा संशय बळावला आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हा परिषद प्रशासन आणि वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे दिसते आहे.एकीकडे शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे शिक्षकांना धमकावून राजकारणात ओढले जात असल्याने पालक आणि संतप्त शिक्षकांकडून सवाल उपस्थित केला जात आहे की—”या भ्रष्ट आणि नियमबाह्य कारभारावर वरिष्ठ प्रशासन किंवा निवडणूक आयोग अखेर कधी कारवाई करणार?”
विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; ट्रॅक्टरमधून अवैध वाहतूक
आमदार सुहास कांदे यांचे फोटो आणि पक्षाचे चिन्ह असलेल्या वह्या-दप्तर वाटप कार्यक्रमाला गर्दी दाखवण्यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील निष्पाप विद्यार्थ्यांना एकत्र करण्यात आले. ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यांवरून कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कोंबून प्रवास करण्यास भाग पाडले गेले. जर एखादा अपघात झाला असता तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. शासकीय नियमांनुसार शालेय विद्यार्थ्यांची अशा प्रकारे मालवाहू वाहनातून वाहतूक करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरतो.गटशिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
MANMAD SAMRAT
✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
manmadsamrat.co.in
The post नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप appeared first on MANMAD SAMRAT.
नांदगाव पोलीस प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईनंतर प्रवीण गुप्तांचे १ जुलैचे आमरण उपोषण मागे! तब्बल एक वर्षानंतर तक्रारीची दखल व्हॉट्सॲपवरून धमकी देणाऱ्याला गुप्तांचे जाहीर आव्हान, १५ ऑगस्टचा प्रशासनाला अल्टिमेटम
नांदगाव पोलीस प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईनंतर प्रवीण गुप्तांचे १ जुलैचे आमरण उपोषण मागे! तब्बल एक वर्षानंतर तक्रारीची दखल
व्हॉट्सॲपवरून धमकी देणाऱ्याला गुप्तांचे जाहीर आव्हान, १५ ऑगस्टचा प्रशासनाला अल्टिमेटम
​नांदगाव (विशेष प्रतिनिधी):येथील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते  प्रवीण मधुकर गुप्ता यांनी प्रशासकीय दिरंगाई विरोधात पुकारलेले १ जुलैचे आमरण उपोषण तूर्तास मागे घेतले आहे. गेल्या एक वर्षापासून प्रलंबित असलेली त्यांची तक्रार नांदगाव पोलिसांनी तात्काळ नाशिक ग्रामीणच्या सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यासोबतच गुप्ता यांनी व्हॉट्सॲप कॉलद्वारे धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाला खुले आव्हान देत प्रशासनाला पुढील कारवाईसाठी १५ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
​काय आहे संपूर्ण प्रकरण?
२ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री २१:१३ वाजता प्रवीण गुप्ता यांच्या मोबाईलवर युनायटेड किंगडम (+४४) या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून एक व्हॉट्सॲप व्हॉईस कॉल आला होता. त्या अज्ञात इसमाने गुप्ता यांना, “तुझ्या मेडिकल दुकानात गांजा ठेवून देईल, तुझी सहा महिने बेल होऊ देणार नाही” अशी खोटी केस करून अडकवण्याची आणि जीवे मारण्याची गंभीर धमकी दिली होती. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NCR No. 0091/2025, कलम 351(4)) नोंदवण्यात आला होता.
​वर्षभराची दिरंगाई आणि पीआय साहेबांची तात्काळ कारवाई
​या तक्रारीवर गेल्या वर्षभरात कोणतीही ठोस तांत्रिक कारवाई झाली नव्हती. त्यामुळे संतप्त होऊन प्रवीण गुप्ता यांनी आगामी १ जुलै २०२६ पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. या उपोषण पत्राची दखल घेत नांदगाव पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक (PI) यशवंत एम. सोळसे यांनी काल प्रवीण गुप्ता यांना पोलीस स्टेशनला चर्चेसाठी बोलावले.चर्चेदरम्यान, वर्षभरापासून प्रलंबित असलेली ही तक्रार तात्काळ सायबर पोलिसांकडे (CDR/IP Log/Subscriber Details मिळवण्यासाठी) वर्ग करण्यात आली. पोलिसांच्या या तत्परतेबद्दल प्रवीण गुप्ता यांनी  पीआय सोळसे  आणि नांदगाव पोलिसांचे जाहीर आभार मानले असून, सकारात्मक मार्ग निघाल्याने १ जुलैचे उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.
​धमकी देणाऱ्याला ‘गुप्ता स्टाईल’ने जाहीर आव्हान!
​उपोषण मागे घेत असतानाच प्रवीण गुप्ता यांनी व्हॉट्सॲप कॉल करून मागून धमक्या देणाऱ्या समाजकंटकाचा खरपूस समाचार घेतला. गुप्ता म्हणाले,
​”तुझ्यात जर खरच दम असेल, तर आंतरराष्ट्रीय किंवा अनोळखी नंबरवरून कॉल न करता, स्वतःच्या नंबरवरून कॉल करून समोर येऊन धमकी दे. मग मी तुला दाखवून देईन की प्रवीण गुप्ता काय चीज आहे! माझे कोणतेही दोन नंबरचे धंदे नाहीत आणि तुझ्याकडे मला जेवायलाही यायचे नाही. मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही.”
​१५ ऑगस्टचा ‘अल्टिमेटम’ कायम
​तूर्तास पोलिसांनी योग्य पाऊल उचलल्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले असले, तरी प्रवीण गुप्ता यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, सायबर विभागाकडून या आंतरराष्ट्रीय क्रमांकाच्या मूळ वापरकर्त्याचा शोध घेऊन जर पुढील ठोस कारवाई झाली नाही, तर आगामी १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर पुन्हा आमरण उपोषणास बसणार, याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
​या सर्व प्रकरणाकडे आता संपूर्ण नांदगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिले असून, आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धमकी देणारा तो अज्ञात सूत्रधार कोण? याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान सायबर पोलिसांसमोर आहे.
MANMAD SAMRAT
✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
manmadsamrat.co.in
The post नांदगाव पोलीस प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईनंतर प्रवीण गुप्तांचे १ जुलैचे आमरण उपोषण मागे! तब्बल एक वर्षानंतर तक्रारीची दखल  व्हॉट्सॲपवरून धमकी देणाऱ्याला गुप्तांचे जाहीर आव्हान, १५ ऑगस्टचा प्रशासनाला अल्टिमेटम appeared first on MANMAD SAMRAT.
नांदगाव दुय्यम निबंधक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (ACB) मोठा दणका; डाटा एंट्री ऑपरेटरसह खाजगी इसम १,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक! छोटा मासा गळाला मोठ्याच काय…?
नांदगाव दुय्यम निबंधक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (ACB) मोठा दणका; डाटा एंट्री ऑपरेटरसह खाजगी इसम १,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक! छोटा मासा गळाला मोठ्याच काय…?
​नांदगांव(महेश पेवाल) : नांदगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात शेतजमिनीच्या खरेदी खतांची प्रमाणित नक्कल प्रत देण्यासाठी १,००० रुपयांची लाच स्वीकारताना एका आयटी असिस्टंट (डाटा एंट्री ऑपरेटर) आणि त्याच्या खाजगी हस्तकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
​या प्रकरणी इलोसे धारासिंग बाबुलाल राठोड (वय ५३, व्यवसाय- आयटी असिस्टंट/डाटा एंट्री ऑपरेटर, नेमणूक- दुय्यम निबंधक कार्यालय, नांदगाव) आणि सागर राजेंद्र बोरसे (वय ३३, व्यवसाय- खाजगी इसम, रा. पिंपळगाव नजीक पाटोदा रोड, लासलगाव) अशा दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र दुय्यय निबंधक यांचे कार्यलाय भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणूनच ओळखले जाते ज्यांना पकडले ते तर फार छोटे मासे आहेत मोठ्या माशांच काय..? असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे.
​काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार यांच्या वडिलांची पूर्वजांची शेतजमीन त्यांच्या चुलत आजोबांनी व इतरांनी परस्पर विक्री केली होती. या प्रकरणी पुढील कायदेशीर लढाई लढण्यासाठी तक्रारदार यांना सदर जमिनीच्या खरेदी खताच्या दस्तऐवजांची प्रमाणित नक्कल प्रत हवी होती. यासाठी त्यांनी १८ मार्च २०२६ रोजी नांदगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रीतसर अर्ज केला होता.
​सदर खरेदी खताची प्रमाणित नक्कल प्रत काढून देण्यासाठी शासनाचे अधिकृत ऑनलाईन चलन केवळ ३२० रुपये इतके होते. मात्र, आरोपी खाजगी इसम सागर बोरसे व लोकसेवक इलोसे राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे या कामासाठी तब्बल १,२०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर तडजोडीअंती १,००० रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), नाशिक कार्यालयाकडे तक्रार नोंदवली.
​एसीबीचा सापळा आणि रंगेहाथ कारवाई:
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १२ जून २०२६ रोजी नांदगाव दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांच्याकडून १,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना दोन्ही आरोपींना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
​कारवाई करणारे अधिकारी:
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. श्री. भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी, आणि अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर, पोलीस अंमलदार पोहवा दिनेश खैरनार, पोहवा अविनाश पवार आणि चालक पोशि समीर शेख यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती नेहा सूर्यवंशी करत आहेत.
​लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन:
शासकीय कार्यालयात कोणत्याही कामासाठी अथवा कामाच्या मंजुरीसाठी शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती लाचेची मागणी करत असल्यास, नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
MANMAD SAMRAT
✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
manmadsamrat.co.in
The post नांदगाव दुय्यम निबंधक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (ACB) मोठा दणका; डाटा एंट्री ऑपरेटरसह खाजगी इसम १,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक! छोटा मासा गळाला मोठ्याच काय…? appeared first on MANMAD SAMRAT.
नांदगावला पावसाचा पहिला दिलासा: अर्धा तास मुसळधार, पण सबवे जलमय झाल्याने वाहतूक ठप्प!
सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे हा महत्त्वाचा रस्ता बंद करावा लागला. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पहिल्याच अर्ध्या तासाच्या पावसाने पालिका आणि संबंधित प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल केली असून, सबवेमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
MANMAD SAMRAT
✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
manmadsamrat.co.in
The post नांदगावला पावसाचा पहिला दिलासा: अर्धा तास मुसळधार, पण सबवे जलमय झाल्याने वाहतूक ठप्प! appeared first on MANMAD SAMRAT.
नांदगाव तहसील कार्यालयासमोर वनजमीन धारक व शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन; हुतात्मा चौकातून शासनाविरोधात एल्गार
नांदगाव तहसील कार्यालयासमोर वनजमीन धारक व शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन; हुतात्मा चौकातून शासनाविरोधात एल्गार
नांदगाव(महेश पेवाल) :तालुक्यातील वनजमीन धारक आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाकडून होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षाच्या निषेधार्थ आजपासून नांदगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले असून, यामुळे तालुक्यातील राजकीय व सामाजिक वातावरण तापले आहे.आंदोलनाची सुरुवात शहरातील ऐतिहासिक हुतात्मा चौकातून करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकरी आणि वनजमीन धारकांनी राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “शेतकऱ्यांच्या हक्काची जमीन मिळालीच पाहिजे”, “प्रशासकीय दिरंगाईचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. हुतात्मा चौकातून रॅली काढून आंदोलक तहसील कार्यालयावर धडकले व तेथेच ठिय्या मांडून बसले.
अखिल भारतीय किसान सभा नाशिक जिल्हा व माकपच्या वतीने १६ ते २३ जानेवारी २०१६ या कालावधीत आमदार कॉ. जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक पायी लाँग मार्च काढण्यात आला होता. या लाँग मार्चची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनजमीन धारकांच्या प्रलंबित मागण्या आणि दावे निकाली काढण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनाला तब्बल दहा वर्षे उलटून गेल्यानंतरही नांदगाव तालुक्यात त्याची अंमलबजावणी झालेली नाही.या आंदोलनात नांदगाव तालुक्यातील शेकडो वनजमीन धारक, शेतकरी, कष्टकरी आणि किसान सभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत तहसील कार्यालयासमोरून न हलण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांवर रोष
आंदोलकांचे नेतृत्व करणारे किसान सभेचे कॉ. विजय दराडे यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. “लाँग मार्चनंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही नांदगाव तालुक्यातील फॉरेस्ट अधिकारी (वन विभाग) आणि तहसीलदार यांच्याकडून या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई किंवा अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे हक्काच्या जमिनीपासून शेतकरी वंचित राहिले असून, त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा इशारा कॉ. दराडे यांनी दिला.
MANMAD SAMRAT
✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
manmadsamrat.co.in
The post नांदगाव तहसील कार्यालयासमोर वनजमीन धारक व शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन; हुतात्मा चौकातून शासनाविरोधात एल्गार appeared first on MANMAD SAMRAT.