मनमाड पालिकेचा सावळा गोंधळ: नळपट्टी, घरपट्टी भरूनही नागरिक नवीन नळ कनेक्शनपासून वंचित; ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ
मनमाड(अजहर शेख) : करंजवन-मनमाड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात नवीन नळ कनेक्शन देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही प्रक्रिया राबवताना मनमाड नगर परिषदेचे कर्मचारी आणि संबंधित ठेकेदाराचे कामगार नागरिकांना नाहक त्रास देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व करांचा भरणा करूनही १५-१५ दिवस कनेक्शन देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
मनमाड शहराचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी करंजवन योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. आता या योजनेद्वारे घरपोच पाणी देण्यासाठी नवीन नळ कनेक्शन दिले जात आहेत. हे कनेक्शन घेण्यासाठी नगरपालिकेने काही अटी घातल्या आहेत. यामध्ये जुनी घरपट्टी आणि नळपट्टी पूर्णपणे भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहराचा विकास आणि पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या हेतूने अनेक नागरिकांनी हजारो रुपयांचा कर भरून पालिकेच्या तिजोरीत भर घातली आहे.

कर्मचारी आणि ठेकेदारांची मुजोरी
कर भरल्याची पावती दाखवूनही प्रत्यक्षात कनेक्शन देण्याच्या कामात मोठी दिरंगाई होत आहे. अनेक नागरिकांनी तक्रार केली आहे की, कर्मचारी आज येऊ, उद्या येऊ असे सांगून वेळ मारून नेत आहेत. १५ दिवस उलटूनही पाइपलाइन जोडणीसाठी कोणीही फिरकत नाही. पालिकेचे संबंधित विभागाचे कर्मचारी आणि ठेकेदाराचे मजूर यांच्यात समन्वय नसल्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

नागरिकांमध्ये नाराजीचा सूर
“आम्ही पालिकेचे सर्व नियम पाळून वेळेवर टॅक्स भरला आहे, जेणेकरून आम्हाला पाणी मिळेल. मात्र, टॅक्स भरूनही पंधरा दिवस झाले तरी नळ जोडणी मिळत नसेल, तर प्रशासनाचा उपयोग काय?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. काही प्रभागांत तर वशिलेबाजीचा वापर करून ठराविक लोकांना लवकर कनेक्शन दिले जात असून, सर्वसामान्यांना मात्र ताटकळत ठेवले जात असल्याचे आरोपही होत आहेत

प्रशासनाकडे मागणी
शहरातील पाणी टंचाईची भीषणता लक्षात घेता, नगरपालिकेने या प्रकाराची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. कर भरणाऱ्या नागरिकांना विनाविलंब नळ जोडणी उपलब्ध करून द्यावी आणि टाळाटाळ करणाऱ्या कर्मचारी किंवा ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.मनमाड पालिकेचा सावळा गोंधळ: नळपट्टी, घरपट्टी भरूनही नागरिक नवीन नळ कनेक्शनपासून वंचित; ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख