Homeताज्या बातम्या२५ वर्षांचा अभूतपूर्व संघर्ष, तीन भावांची पराकोटीची जिद्द अन् 'छबिला'चा ऐतिहासिक सुवर्णक्षण!...

२५ वर्षांचा अभूतपूर्व संघर्ष, तीन भावांची पराकोटीची जिद्द अन् ‘छबिला’चा ऐतिहासिक सुवर्णक्षण! नाशिकच्या छोट्याशा ‘रघुवीर तांड्या’तून निघालेला स्वप्नप्रवास ६२व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांच्या शिखरावर!

​मनमाड(आमिन शेख):- चित्रपट बनवण्याचे स्वप्न अनेक जण पाहतात; पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे फार थोडे असतात. नाशिक जिल्ह्यातील मनमाड नजीक असलेल्या  ‘रघुवीर तांडा, अनकवाडे’ या एका अत्यंत छोट्या आणि उपेक्षित तांड्यात पाहिलेले स्वप्न जेव्हा महाराष्ट्राच्या सर्वोच्च सांस्कृतिक व्यासपीठावर सुवर्ण अक्षरांनी कोरले जाते, तेव्हा तो केवळ एका चित्रपटाचा विजय राहत नाही, तर तो एका संपूर्ण समाजाच्या अस्मितेचा आणि संघर्षाचा हुंकार ठरतो.तब्बल २५ वर्षांच्या अथक संघर्षातून साकारलेल्या ‘छबिला’ या मराठी चित्रपटाने ६२व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये पाच महत्त्वाच्या आणि मानाच्या पुरस्कारांवर आपले नाव कोरून इतिहास घडवला आहे.तीन भावाची जिद्द त्यांना इथपर्यंत घेऊन आली आहे

छबिला चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल अमृत भालेराव यांचे बालपण आणि संपूर्ण आयुष्य या तांड्याच्या मातीतच घडले. लहानपणापासूनच आपल्या लभाण समाजाच्या वाट्याला आलेली उपेक्षा, वंचना, वेदना आणि त्यांचा दैनंदिन जीवनसंघर्ष त्यांनी अत्यंत जवळून अनुभवला होता. चित्रपटांसारख्या प्रभावी माध्यमातून मनोरंजन करण्यापेक्षा आपल्या समाजाची ही खरीखुरी व्यथा जगासमोर का मांडू नये? हा विचार त्यांच्या मनात रुजला आणि याच विचारातून ‘छबिला’ या चित्रपटाची बीज रोवली गेली.परंतु, हे वास्तव पडद्यावर आणणे सोपे नव्हते. या वेगळ्या, संवेदनशील आणि वास्तववादी विषयावर चित्रपट बनवण्यासाठी कोणताही मोठा निर्माता पुढे येत नव्हता. वर्षानुवर्षे निर्मात्यांचा शोध सुरू होता, आर्थिक अडचणी होत्या, पण अनिल भालेराव यांनी आपले स्वप्न जिवंत ठेवले. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले, तेव्हा अनिल भालेराव आणि त्यांच्या दोन भावांनी असा एक निर्णय घेतला, ज्याची प्रचिती मराठी चित्रपटसृष्टीत क्वचितच पाहायला मिळते.​“जर आपल्या समाजाची व्यथा मांडायला दुसरा कोणी निर्माता मिळत नसेल, तर आपण स्वतःच हा चित्रपट बनवायचा!”

​तीन भावांनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आणि कर्जाचा डोंगर अंगावर घेऊन चित्रपट निर्मितीच्या अथांग सागरात उडी घेतली:अनिल अमृत भालेराव (दिग्दर्शक & लेखक) ज्यांनी आपल्या मातीची कथा ताकदीने कागदावर आणि पडद्यावर उतरवली.

​अजय अमृत भालेराव (निर्माता & सिनेमॅटोग्राफर) ज्यांनी चित्रपटाची दृश्यभाषा अतिशय प्रभावीपणे कॅमेऱ्यात कैद केली. (यापूर्वी त्यांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट छायांकन’ पुरस्कार मिळालेला आहे).व अरुण अमृत भालेराव (अभिनेता, संकलन & प्रोडक्शन): ज्यांनी अभिनयासोबतच निर्मिती व्यवस्थापनाची आणि संकलनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.एकाच कुटुंबातील तीन भावांनी स्वतःच्या जिद्दीवर, कर्जाच्या जोरावर आणि कलेवरील अढळ विश्वासावर हा चित्रपट पूर्ण केला व त्यांनी  यशाला गवसणी घातली महाराष्ट्र शासनाच्या वतीने घोषित झालेल्या ६२व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘छबिला’ने आपले वर्चस्व सिद्ध करत पाच प्रमुख सन्मान पटकावले यात  सर्वोत्कृष्ट चित्रपट (प्रथम) छबिला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (प्रथम) अनिल अमृत भालेराव सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  स्वाती गोतावळे, सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण दिग्दर्शक  अनिल अमृत भालेराव व  उत्कृष्ट ध्वनीमुद्रण  सतीश दडस यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.राज्य पुरस्कारांच्या या ऐतिहासिक यशाआधीच ‘छबिला’ने देश-विदेशातील अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

​पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF)मध्ये  अधिकृत निवड आणि अभिनेत्री स्वाती गोतावळे यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा सन्मान मिळालेला आहे याशिवाय थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल दिग्दर्शक अनिल अमृत भालेराव यांना ‘ज्युरी स्पेशल / सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार देखील मिळाला आहे.इतर प्रमुख महोत्सवांमध्ये सहभाग नोंदवला असुन यात ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिव्हल, कोलकाता पीपल्स फिल्म फेस्टिव्हल, यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, अहमदाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि चित्रपताका यांचा सहभाग आहे.

​दमदार कलाकारांची आणि तंत्रज्ञांची साथ

​चित्रपटातील कलाकारांच्या वास्तववादी अभिनयामुळे कथेतील पात्रांना अस्सलपणा मिळाला. विनय धाकडे, स्वाती गोतावळे, अरुण अमृत भालेराव, दिलीप डोंबे, राजकिरण कुंभारिकर, देवा पांडे, महेश घुमरे, काजल परदेशी, ईश्वर मोरे, सचिन पाटील, राजश्री पाटील आणि भाग्यश्री पाटील या सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकांत जीव ओतला.तसेच अविनाश माळी (कला दिग्दर्शन), वृषभ सुतार (संकलन), आणि कैलास भालेराव व विजय सुरेश चव्हाण (प्रोडक्शन) यांच्या तांत्रिक योगदानामुळे चित्रपट तांत्रिकदृष्ट्याही अत्यंत उत्कृष्ट बनला.

​हा विजय केवळ चित्रपटाचा नाही, तर हिमतीचा आहे!

​२५ वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष, आर्थिक संकटं, स्वतःच्याच पैशांनी आणि कर्जावर उभा केलेला चित्रपट आणि अखेर मिळालेली ही ऐतिहासिक पावती… ‘छबिला’चा हा संपूर्ण प्रवास प्रत्येक नवोदित कलाकारासाठी प्रेरणादायी आहे.​रघुवीर तांडा ते महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार मंच, हा प्रवास सिद्ध करतो की—”जर स्वप्न प्रामाणिक असेल, कष्टाची तयारी असेल आणि जिद्द कायम असेल, तर एका छोट्याशा तांड्यातूनही इतिहासाच्या पानांवर सुवर्णअक्षरांनी नाव कोरता येते!”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!