Homeताज्या बातम्यामनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा: मनमाडमध्ये नांदगाव तालुक्याच्या वतीने साखळी उपोषण...

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा: मनमाडमध्ये नांदगाव तालुक्याच्या वतीने साखळी उपोषण सुरू; ठाकरे गट आणि अजित पवार गटाचा पाठिंबा

​मनमाड (प्रतिनिधी):- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मनमाड शहरातील ऐतिहासिक एकात्मता चौकात नांदगाव तालुक्याच्या वतीने साखळी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून मोठा पाठिंबा मिळत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीनेही या उपोषणाला सक्रिय पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.

​ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, जरांगे पाटील यांच्या आंतरवली सराटी येथील उपोषणाचे लोण आता राज्यभर पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर मनमाड येथील एकात्मता चौकात नांदगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाचा मंडप ठोकण्यात आला आहे.
​उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपोषणस्थळी दाखल झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मराठा आरक्षणाच्या या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता.एकात्मता चौकातील या साखळी उपोषणात तालुक्यातील नागरिक, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. जोपर्यंत जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हे साखळी उपोषण आणि आंदोलन तीव्र स्वरूपात सुरूच राहील, असा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.

उद्या इंदुर- पुणे महामार्गावर चक्काजाम आंदोलन..!
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनमाड येथे साखळी उपोषण सुरू आहे दिनांक 5 सप्टेंबर रोजी शहरातुन जाणाऱ्या इंदुर पुणे महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा आंदोलकांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे उद्या या महामार्गावरील वाहतूक वळवली जाणार का ..? याबाबत वाहनचालकामध्ये संभ्रम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा

0
​मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा   https://youtu.be/lWGHCZcM6hM?si=HlmNgTLY6Z4WBBHG ​मनमाड(प्रतिनिधी ):- मनमाड शहरात एका मद्यधुंद ट्रक चालकाने प्रचंड धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना...

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

error: Content is protected !!