मनमाड महाविद्यालयात विद्यार्थिनींनी केले श्रमदान; परिसर स्वच्छतेचा घेतला ध्यास!
मनमाड(प्रतिनिधी):- “आपण ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतो, त्या महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे,” अशी भावना व्यक्त करत मनमाड महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी एकत्र येत संपूर्ण महाविद्यालय परिसरात उत्स्फूर्तपणे श्रमदान केले.महाविद्यालयाचे प्राचार्य पी. जी. आंबेकर आणि प्राध्यापक डॉ. पवन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत हा स्वच्छता व श्रमदान उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला.
महाविद्यालय परिसरातील मैदानावर आणि इमारतीच्या आजूबाजूला वाढलेले सुके गवत, झाडीझुडपे आणि कचरा साफ करण्यासाठी विद्यार्थिनींनी सकाळीच एकत्र येऊन कामाला सुरुवात केली. हातात झाडू आणि इतर साहित्य घेऊन विद्यार्थिनींनी अत्यंत उत्साहाने संपूर्ण परिसर चकाचक केला. केवळ उपक्रम म्हणून नव्हे, तर आपल्या संस्थेप्रती असलेली जबाबदारी ओळखून विद्यार्थिनींनी या श्रमदानात आपला सहभाग नोंदवला.या प्रसंगी बोलताना प्राचार्य पी. जी. आंबेकर यांनी विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, हाच अशा उपक्रमांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. पवन परदेशी यांनीही विद्यार्थिनींना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत त्यांच्या या कार्यास प्रोत्साहन दिले.या उपक्रमामुळे महाविद्यालयाचा परिसर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर दिसू लागला असून, विद्यार्थिनींच्या या श्रमदानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आपणही समाजाचे देणं लागतो म्हणून उपक्रम
आपण सर्वजण एका समाजात राहतो समाजातील स्वच्छता करणे हे आपले कर्तव्य आहे आपल्या घराजवळ आपण स्वच्छता करतो तसेच महाविद्यालयात आपण शिक्षण घेतो त्यामुळे हाही परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे यासाठी आम्ही विविध प्रकारचे उपक्रम राबवून स्वच्छता करत असतो आज शिक्षण दिन होता त्यानिमित्ताने आम्ही आज स्वच्छतेची मोहीम राबविली आहे आम्ही कायम बॉटनिकल गार्डन लॅब याठिकाणी स्वच्छता केली आहे आताही करत राहू
-वैशाली शेळके,विद्यार्थीनी

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
































