Homeताज्या बातम्यामनमाड बाजार समिती सत्तासंघर्ष: आमदार सुहास कांदेंच्या दबावाविरोधात संचालकांची थेट पोलीस अधीक्षकांकडे...

मनमाड बाजार समिती सत्तासंघर्ष: आमदार सुहास कांदेंच्या दबावाविरोधात संचालकांची थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव; तालुक्याबाहेरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशीची मागणी

मनमाड बाजार समिती सत्तासंघर्ष: आमदार सुहास कांदेंच्या दबावाविरोधात संचालकांची थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव; तालुक्याबाहेरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशीची मागणी

मनमाड(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीवरून मनमाडमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात बाजार समितीच्या ९ प्रमुख संचालकांनी थेट बंड पुकारल्याने मोठी उलथापालथ झाली आहे. आमदार कांदे यांच्याकडून राजकीय दबावाचा आणि विविध प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल केले जाण्याची भीती संचालकांनी व्यक्त केली असून, याप्रकरणी त्यांनी थेट नाशिक ग्रामीणच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे. आमच्यावर किंवा आमच्या परिवारातील इतर सदस्यांवर कोणत्याही प्रकारचे खोटे गुन्हे दाखल केले जाऊ शकता यामुळे तालुक्या बाहेरील अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून सत्यता पडताळूनच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या संचालकांनी केली आहे
              याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन २०२३ ते २०२८ या काळासाठी झालेल्या एप्रिल २०२३ मधील निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांच्या पॅनलचा पराभव करून हे संचालक निवडून आले आहेत. दरम्यान, १० जुलै २०२६ रोजी विद्यमान सभापती मा. आ. संजय सयाजी पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बाजार समितीच्या नवीन सभापती निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या 27 जुलै रोजी ही निवडणूक पार पडणार आहे यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून सध्या या बंडखोर गटाकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा संचालकांनी केला आहे. समीर भुजबळ, दीपक गोगड आणि गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली नवीन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रशासनाकडे दावा दाखल करण्यात आला आहे.मात्र आपल्या हातातील सत्ता निसटत असल्याचे पाहून आमदार सुहास कांदे हे विविध शासकीय यंत्रणांवर दबाव आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला आहे. बहुमत असलेल्या संचालकांना आपल्याकडे वळवण्यासाठी आमदार पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत असून, संचालकांवर व त्यांच्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे ‘ संभाव्य राजकीय सुडबुद्धीच्या कारवाईच्या भीतीने नांदगाव विधानसभा प्रमुख गणेश जगन्नाथ धात्रक, माजी आमदार संजय सयाजी पवार, डॉ. पुंजाराम पोपट आहेर यांच्यासह ९ संचालकांनी नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला आहे. या पत्रात त्यांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत राजकीय दबावामुळे होणाऱ्या कोणत्याही खोट्या तक्रारींची पूर्ण सत्यता तपासल्याशिवाय मनमाड व नांदगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कोणताही गुन्हा दाखल करू नये. आलेल्या तक्रारींची चौकशी निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नांदगाव तालुक्याबाहेरील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी.या अर्जाच्या प्रती मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री गिरीषभाऊ महाजन, मनमाडचे विभागीय पोलीस अधिकारी आणि मनमाड व नांदगाव शहराच्या पोलीस निरीक्षकांना तात्काळ योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.या अर्जावर माजी आमदार संजय सयाजी पवार, डॉ. पुंजाराम पोपट आहेर, गणेश जगन्नाथ धात्रक, कैलास नामदेव भाबड, विठ्ठल काशिनाथ आहेर, सुभाष जयराम उगले, योगेश दुर्योधन कदम, आनंदा विठ्ठल मार्केड आणि सौ. संगीता रमेश कराड या संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या सत्तासंघर्षामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली असून आगामी सभापती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा प्रशासकीय यंत्रणेवर अविश्वास…?
नांदगाव तालुक्यातील सत्ताधारी गटाकडून जे विरोधात काम करतात व जे त्यांच्याकडे येण्यास तयार नाही अशा नागरिकांवर अनेक प्रकारे खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रथा सुरू आहे यास मनमाड पोलीस निरीक्षक विजय करे यांनी प्रत्युत्तर देत एका व्यक्तीच्या घरी गांजा टाकून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता मात्र विजय करे यांनी याबाबत सखोल तपास करून मुख्य सूत्रधारांना अटक करून कायदा अजून जिवंत आहे याचे उदाहरण दिले होते मात्र सर्वच अधिकारी करे यांच्यासारखे नाहीत त्यामुळे तालुक्यातील सर्वच शासकीय यंत्रणेवरून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा अविश्वास असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. राज्याचे गृहमंत्री नांदगाव तालुक्याला यातून मुक्त करतील का ..? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न

0
मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न ​मनमाड (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मनमाड शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि देशप्रेमाच्या रंगात न्हालेली एक भव्य...

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार...

0
नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र ​नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध...

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...

error: Content is protected !!