Homeब्रेकिंगमनुवाद के छातीपर आंबेडकर आंबेडकर ; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनमाडला भिसैनिकांचा...

मनुवाद के छातीपर आंबेडकर आंबेडकर ; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनमाडला भिसैनिकांचा जल्लोष

मनमाड शहरात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्या नंतर आंबेडकरवादी संविधान प्रेमी व  भीमसैनिकांचा जल्लोष; फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटले 
मनमाड (प्रतिनिधी):NEET-UG परीक्षेतील कथित घोटाळा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर गेल्या अनेक दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांचे तीव्र आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला अखेर मोठे यश आले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला आहे.केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मनमाड शहरात आंबेडकरवादी संविधान प्रेमी व भीमसैनिकांच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
              मनमाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंबेडकरवादी संविधान प्रेमी
आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘मनुवाद के छातीपर आंबेडकर आंबेडकर’, ‘विद्यार्थी एकतेचा विजय असो’ घेतला रे घेतला राजीनामा घेतला अशा जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुतळा परिसरात प्रचंड फटाक्यांची आतिषबाजी केली. आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसमोर अखेर केंद्र सरकारला नमावे लागल्याचे सांगत, कार्यकर्त्यांनी उपस्थित नागरिकांना आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या या ऐतिहासिक आंदोलनापुढे झुकत मंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे हा देशभरातील विद्यार्थ्यांचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या जल्लोष आंदोलनात मनमाड शहरातील गुरुकुमार निकाळे,विलास आहिरे,प्रवीण पगारे,विशाल पाटील,रवी निकम, बॉबी पवार भय्या निकम सोनू गवळे,किरण भालेराव, एस एम भाले, कदीर शेख,ऍड आम्रपली निकम,सूरेश आहिरे,श्रीकृष्ण पगारे,कांबळे बाबुजी, सिद्धांत पाटील,अमोल लंकेश्वर,यासह वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भीमबांधव उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा

0
​मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा   https://youtu.be/lWGHCZcM6hM?si=HlmNgTLY6Z4WBBHG ​मनमाड(प्रतिनिधी ):- मनमाड शहरात एका मद्यधुंद ट्रक चालकाने प्रचंड धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना...

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

error: Content is protected !!