Homeताज्या बातम्यानांदगाव तहसील कार्यालयासमोर वनजमीन धारक व शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन; हुतात्मा चौकातून...

नांदगाव तहसील कार्यालयासमोर वनजमीन धारक व शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन; हुतात्मा चौकातून शासनाविरोधात एल्गार

नांदगाव तहसील कार्यालयासमोर वनजमीन धारक व शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन; हुतात्मा चौकातून शासनाविरोधात एल्गार

नांदगाव(महेश पेवाल) :तालुक्यातील वनजमीन धारक आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाकडून होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षाच्या निषेधार्थ आजपासून नांदगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले असून, यामुळे तालुक्यातील राजकीय व सामाजिक वातावरण तापले आहे.आंदोलनाची सुरुवात शहरातील ऐतिहासिक हुतात्मा चौकातून करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकरी आणि वनजमीन धारकांनी राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “शेतकऱ्यांच्या हक्काची जमीन मिळालीच पाहिजे”, “प्रशासकीय दिरंगाईचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. हुतात्मा चौकातून रॅली काढून आंदोलक तहसील कार्यालयावर धडकले व तेथेच ठिय्या मांडून बसले.
            अखिल भारतीय किसान सभा नाशिक जिल्हा व माकपच्या वतीने १६ ते २३ जानेवारी २०१६ या कालावधीत आमदार कॉ. जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक पायी लाँग मार्च काढण्यात आला होता. या लाँग मार्चची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनजमीन धारकांच्या प्रलंबित मागण्या आणि दावे निकाली काढण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनाला तब्बल दहा वर्षे उलटून गेल्यानंतरही नांदगाव तालुक्यात त्याची अंमलबजावणी झालेली नाही.या आंदोलनात नांदगाव तालुक्यातील शेकडो वनजमीन धारक, शेतकरी, कष्टकरी आणि किसान सभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत तहसील कार्यालयासमोरून न हलण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांवर रोष
आंदोलकांचे नेतृत्व करणारे किसान सभेचे कॉ. विजय दराडे यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. “लाँग मार्चनंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही नांदगाव तालुक्यातील फॉरेस्ट अधिकारी (वन विभाग) आणि तहसीलदार यांच्याकडून या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई किंवा अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे हक्काच्या जमिनीपासून शेतकरी वंचित राहिले असून, त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा इशारा कॉ. दराडे यांनी दिला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लावणी, ड्रॅग आणि ड्रामा: पुणे सतरंग फेस्ट विलक्षण कथा साजरा करतो

0
अहोन गुप्तूच्या ड्रॅग ड्रामा 'आयटम' मधील दृश्ये (फोटो क्रेडिट: नयनतारा मुझुमदार) पुणे: या जून महिन्यात सहा दिवसांसाठी, श्रीराम लागू रंग-आकाश विलक्षण कथाकथन, कार्यप्रदर्शन...

महत्त्वाच्या येरवडा जंक्शनवर उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटरच्या प्रस्तावात प्रथम झाडे

0
पुणे : अलिकडच्या वर्षांत पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी झाडांचा बळी देण्यावरून शहरातील रहिवासी आणि नागरी प्रशासन यांच्यात अनेक संघर्ष झाले आहेत. पुणे महानगरपालिकेची कृती योजना...

भारतीय जनता पार्टी नाशिक (उत्तर ग्रामीण )विस्तारित कार्यकारणी मनमाड मंडलातील सदस्यांची वर्णी

0
भारतीय जनता पार्टी नाशिक (उत्तर ग्रामीण )विस्तारित कार्यकारणी मनमाड मंडलातील सदस्यांची वर्णी मनमाड(अजहर शेख) : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्या आदेशाने मनमाड मंडलातील...

पाटबंधारे विभागाचे मुख्यालय पुण्याबाहेर हलवण्याच्या योजनेचा आढावा घेण्याची सरकारला आम आदमी पार्टीची विनंती

0
पुणे : पाटबंधारे विभागाचे मुख्यालय पुण्याहून कोल्हापूर आणि सोलापूरला हलवण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी सोमवारी...

भारत हवामान वेधशाळा आणि एआय मॉडेल तयार करतो, अंदाज हायपरलोकल असतात

0
भारत एक क्रांतिकारी हवामान वेधशाळा नेटवर्क सुरू करत आहे जे भव्य हिमालयापासून ते मूळ अंदमान बेटांपर्यंत पसरलेले आहे. पुणे: हिमालयापासून अंदमानपर्यंत, भारत दीर्घकालीन...

error: Content is protected !!