मनमाडला वनविभागाच्या सतर्कतेमुळे कोल्ह्यास मिळाले जीवनदान

मनमाड(प्रतिनिधी):- मनमाड येथील रेल्वे इंजिनिअरिंग कारखाना येथे वन्यप्राणी कोल्हा हा अत्यंत कमजोर अवस्थेत आढळून आला होता त्याला मनमाड वनविभागाने रेस्क्यु करून जीवनदान दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाड येथील रेल्वे इंजिनिअरिंग कारखाना येथे वन्यप्राणी कोल्हा हा अत्यंत कमजोर अवस्थेत आढळून आल्याने रेल्वे विभागाकडून श्रीमती सोनाली वाघ वनरक्षक यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविण्यात आले. राहुल घुगे वनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांचे मार्गदर्शनानुसार जे. के. शिरसाठ वनपाल मनमाड, आधुनिक वन्यप्राणी बचाव पथक निफाडचे पथक, त्यात अंकुश गुंड, काशिनाथ माळी, विजय माळी व मनमाड येथील अनुसया कमल अहोरी फाउंडेशन चे शुभम दोंदे, प्रतिक दोंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सदरचा कोल्हा रेल्वे वर्कशॉप मनमाड येथून रेस्क्यू करण्यात आला. या प्रसंगी वरीलप्रमाणे पथक व श्रीमती सोनाली वाघ वनरक्षक विसापूर, जे. के. शिरसाठ वनपाल, इरफान सैय्यद वनसेवक हे उपस्थित होते.कोल्हा या वन्यप्राण्याला पुढील उपचारासाठी शासकीय वाहनातून TTC नाशिक येथे हलविण्यात आले.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख

































