Homeताज्या बातम्यामनमाड एसटी आगारात प्रवाशाची अडवणूक; सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा खळबळजनक आरोप

मनमाड एसटी आगारात प्रवाशाची अडवणूक; सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा खळबळजनक आरोप

मनमाड एसटी आगारात प्रवाशाची अडवणूक; सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा खळबळजनक आरोप

मनमाड(विशेष प्रतिनिधी,,) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मनमाड आगारात प्रवाशांना देण्यात येणाऱ्या वागणुकीचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सवलत पास काढण्यासाठी आलेल्या एका वृद्ध प्रवाशाला दिवसभर ताटकळत ठेवून, त्यांच्याकडून नियमापेक्षा जास्त पैसे उकळल्याचा आणि त्यांना अपमानित केल्याचा गंभीर आरोप एका तक्रार अर्जाद्वारे करण्यात आला आहे.नांदगाव तालुक्यातील मोहेगाव येथील रहिवासी नामदेव कारभारी शिंदे यांनी याप्रकरणी मनमाडच्या आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
             शिंदे हे १७  मे २०२६ रोजी सकाळी ११ च्या सुमारास एसटीचा सवलत पास काढण्यासाठी मनमाड आगारात गेले होते. मात्र, तिथल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना सकाळी ११ ते सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत विनाकारण बसवून ठेवले.तक्रारदाराने अर्जात नमूद केल्यानुसार, सवलत पाससाठी अधिकृत शुल्क २०० रुपये असताना, तिथल्या व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून १०० रुपये जादा, म्हणजेच एकूण ३०० रुपये घेतले. विशेष म्हणजे, जास्तीचे पैसे देऊनही त्यांना सायंकाळपर्यंत पास देण्यात आला नाही. जेव्हा त्यांनी या दिरंगाईबद्दल विचारणा केली, तेव्हा त्यांना अत्यंत हीन दर्जाची आणि अपमानजनक वागणूक देण्यात आली.यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी “तुम्हाला ज्याच्याकडे तक्रार करायची आहे त्याच्याकडे करा, आमचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही, माझ्या नादी लागू नका” अशा शब्दांत अरेरावी केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. सरकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची होणारी ही पिळवणूक आणि कर्मचाऱ्यांची मुजोरी आता चव्हाट्यावर आली आहे.एकीकडे एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य मिरवत असताना, दुसरीकडे आगारात होणारा हा भ्रष्टाचार आणि उद्धटपणा प्रवाशांच्या संतापाचे कारण ठरत आहे. आगार व्यवस्थापक या तक्रारीची दखल घेऊन संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पीडित प्रवाशाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
कर्मचाऱ्यांमुळे हॉस्पिटलमध्ये जाणे टळले..!
माझी काही वर्षांपूर्वी हृदयाची बायपास सर्जरी करण्यात आली आहे त्यामुळे मला दर महिन्याला रूटीन चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागते याशिवाय जेष्ठ नागरीक म्हणून मला सवलत पास हवा होता यासाठी मी गेलो मात्र तेथील मुजोर कर्मचाऱ्यांनी मला अशी वागणूक दिली मला या कामचुकार आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे रूटीन चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणे टळले आगार प्रमुख यांनी याबाबत रीतसर कारवाई करावी व मला न्याय द्यावा…
नामदेव कारभारी शिंदे तक्रारदार जेष्ठ नागरीक
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा

0
​मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा   https://youtu.be/lWGHCZcM6hM?si=HlmNgTLY6Z4WBBHG ​मनमाड(प्रतिनिधी ):- मनमाड शहरात एका मद्यधुंद ट्रक चालकाने प्रचंड धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना...

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

error: Content is protected !!