Homeताज्या बातम्यामनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन 

मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन 

मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन 
​मनमाड(प्रतिनिधी) : – मनमाड नगरपरिषद हद्दीतील ‘आय.यु.डी.पी.’ (IUDP) साईट क्र. १८ येथील जागा गोरगरीब व बहुजन समाजातील मुलांच्या मनोरंजनासाठी ‘सार्वजनिक गार्डन’ म्हणून राखून ठेवण्याऐवजी, ती जागा केवळ पुत्रप्रेमापोटी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत  वैयक्तिक भाडेकराराने देण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.याआधीही त्यांनी पालिकेला याबाबत रीतसर पत्रव्यवहार केला होता मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन करण्यात आले.”
​               याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाड नगरपरिषदेने १० एप्रिल २०२६ रोजी घेतलेल्या स्थायी समितीच्या सभेत  ठराव क्र. १० नुसार, ही मोक्याची जागा खाजगी वापरासाठी भाडेकराराने देण्याचा घाट घातला आहे. केवळ आपल्या पुत्रप्रेमापोटी हे सर्व उठाठेव लोकनियुक्त नगराध्यक्ष करत असल्याचे वंचीत बहुजन आघाडीने सांगितले असुन ही जागा आरक्षित असताना व याठिकाणी केवळ 10 टक्के बांधकाम परवानगी असताना या जागेवर आता खाजगी ‘टर्फ’चे कामही सुरू झाले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीने याआधी १३ मे २०२६ रोजी निवेदनाद्वारे ही जागा सार्वजनिक वापरासाठीच ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने अखेर आज आंदोलन पुकारण्यात आले होते.यावेळी शहराध्यक्ष विलास अहिरे व वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही हे आंदोलन केवळ तात्पुरते स्थगित केले आहे. जर प्रशासनाने हा बेकायदेशीर ठराव त्वरित रद्द केला नाही, तर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.”
या धरणे आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष विलास अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे आणि जिल्हा सचिव कादिर शेख यांनी केले. तसेच जिल्हा नेते दिपक साळवे , संदीप पवार, निलेश निकम, सागर गाढे, राकेश पगारे, अमोल केदारे, अशफाक शहा, काकासाहेब भालेराव, खुशाल थोरात, सुनील बागुल.किरण पगारे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलन सुरू असतानाच आंदोलन कर्त्याना घरपट्टीच्या नोटीस…?
पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर वंचीत बहुजन आघाडीतर्फे धरणे आंदोलन सुरू होते यावेळी आता कोणत्याही प्रकारची वसुली नसताना व कोणत्याही प्रकारचा मार्च एंड नसताना अचानकपणे आंदोलन कर्ते व वंचीतचे शहराध्यक्ष विलास आहिरे यांच्या घरी पालिकेच्या थकबाकीची नोटीस पाठवली मुळात विलास आहिरे यांनी नुकतीच सार्वत्रिक निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांच्याकडे थकबाकी असणे शक्य नाही तरीही त्यांना नोटीस पाठवण्यात आली हा केवळ निव्वळ योगायोग की पालिकेच्या वतीने काही डाव खेळण्यात आला याबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा

0
​मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा   https://youtu.be/lWGHCZcM6hM?si=HlmNgTLY6Z4WBBHG ​मनमाड(प्रतिनिधी ):- मनमाड शहरात एका मद्यधुंद ट्रक चालकाने प्रचंड धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना...

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

error: Content is protected !!