Homeब्रेकिंगपाणीपुरवठा समस्यांवर नगराध्यक्षांची धडक कारवाई मनमाड सम्राटच्या वृत्ताची घेतली दखल...!

पाणीपुरवठा समस्यांवर नगराध्यक्षांची धडक कारवाई मनमाड सम्राटच्या वृत्ताची घेतली दखल…!

 पाणीपुरवठा समस्यांवर नगराध्यक्षांची धडक कारवाई मनमाड सम्राटच्या वृत्ताची घेतली दखल…!

मनमाड(राजेंद्र धिंगाण)  : शहरातील विविध भागांमध्ये घाण पाणी येणे तसेच नळांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत मनमाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. योगेश भाऊ पाटील यांनी संबंधित भागांना प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
मनमाड-येवला रोडवरील आयोध्या नगर तसेच वसाहत ट्रेनिंग कॉलेज परिसरात नगराध्यक्षांनी भेट देऊन पाण्याची तपासणी केली. या तपासणीत पाणी स्वच्छ असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. यावर तातडीने कार्यवाही करत संबंधित ठेकेदार व कंपनी प्रतिनिधींना घटनास्थळी बोलावून नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्याचे निर्देश देण्यात आले. पाईपलाईनमधील त्रुटी तात्काळ दूर करून नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यावेळी अध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह पाणीपुरवठा सभापती विशाल आहिरे व सामाजिक कार्यकर्ते लोकेश साबळे तसेच पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते दरम्यान,  मनमाड शहरासाठी राबविण्यात येत असलेली करंजवण पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाईपलाईन जोडणी व नळ कनेक्शन देण्याचे काम सुरू असून डंमरे प्लॉट, आयोध्या नगर आणि वसाहत ट्रेनिंग कॉलेज परिसरात पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे व पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला जाणवणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याचे कामही प्रशासनाकडून हाती घेण्यात आले असून आज तातडीने 14नंबर शाळे मागे पाईपलाईन चे दोन स्वतंत्र भागात विभाजन करण्यात आले असून सदरील भागात पुर्ण दाबाने पाणीपुरवठा करता येणार आहे.
नगराध्यक्ष योगेश पाटील, मुख्याधिकारी श्री. शेषराव चौधरी, शिवसेना गटनेते महेंद्र शिरसाठ, , मुक्तार शेख व पाणीपुरवठा कर्मचारी यांनी वाघदर्डी व भारत नगर येथील फिल्टर हाऊसला भेट देऊन पाणीपुरवठा यंत्रणेची सखोल पाहणी केली. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना स्वच्छ, नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.प्रत्येक नागरिकाला मुबलक व योग्य दाबाने पाणीपुरवठा मिळावा,नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद प्रत्यक्ष भेटीद्वारे समस्या सोडविण्याच्या नगराध्यक्ष यांचे प्रयत्नांमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नगराध्यक्ष योगेश पाटील यांचे अभिनंदन…!

मनमाड नगर पालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अत्यंत दूषित असल्याचे वृत्त मनमाड सम्राट ने प्रसिध्द केले याची मनमाड नगरीचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी तात्काळ दखल घेतली व थेट कॅम्प भागात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली पाणी पुरवठा योजनेच्या सर्व प्रमुख अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेतली व कशामुळे हा प्रकार घडला याची चौकशी करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले या तत्परतेबद्दल नागरिकांकडून नगराध्यक्ष योगेश पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!