Homeताज्या बातम्यामनमाडमध्ये आचारसंहितेचा फज्जा? सत्ताधारी आमदारांचे बॅनर झळकल्याने नागरिकांचा संताप

मनमाडमध्ये आचारसंहितेचा फज्जा? सत्ताधारी आमदारांचे बॅनर झळकल्याने नागरिकांचा संताप

मनमाडमध्ये आचारसंहितेचा फज्जा? सत्ताधारी आमदारांचे बॅनर झळकल्याने नागरिकांचा संताप

मनमाड(प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यात सध्या निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू असतानाही, मनमाड शहरात सत्ताधारी आमदार आणि नगरसेवकांचे विकासकामांच्या भूमिपूजनाचे मोठे बॅनर झळकत असल्याचे चित्र आहे. “आचारसंहिता केवळ विरोधकांसाठीच आहे का?” असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.शहरात विरोधकाचे बॅनर लागले की पालिका प्रशासन तसेच बॅनर प्रमुख मटरु चुनियान हे तात्काळ याची तक्रार आली त्याची तक्रार आली असे सांगुन बॅनर काढुन टाकतात मात्र सत्ताधारी आमदार आणि नगरसेवक नगराध्यक्ष यांना यातुन सूट दिली जात आहे मुख्याधिकारी देखील यांना पाठीशी घालत असल्याचा खळबळजनक आरोप सर्वसामान्य जनतेकडून केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या नाशिक जिल्ह्यात विधान परिषदेची निवडणूक आचारसंहिता लागू आहे याशिवाय शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये देखील पोट निवडणूक होत आहे यासाठी आदर्श आचारसंहिता सुरू असुन शहरातील मातोश्री रमाबाई नगर परिसरात एका रस्ते कामाच्या भूमिपूजनाचा बॅनर लावण्यात आला आहे. यावर स्थानिक आमदार सुहास कांदे आणि इतर लोकप्रतिनिधींचे फोटो झळकत आहेत. विशेष म्हणजे, या बॅनरवर भूमिपूजनाची तारीख १६ मे २०२६ अशी नमूद आहे.आचारसंहिता सुरू असताना सत्ताधारी गटांच्याआमदार खासदार किंवा नगरसेवक यांना विशेष परवानगी आहे का..? त्यांना नियम लागू नाहीत का..? असा सवाल उपस्थित केला जात असुन मुख्याधिकारी यांचे विशेष प्रेम त्यांच्यावर आहे का..? स्वयंघोषित बॅनर प्रमुख मटरु चुनियान यांना हे बॅनर दिसत नाही का असा सवालही उपस्थित केला जात आहे केवळ विरोधकाचे बॅनर काढुन शाबासकी मिळवण्यासाठी चुनियान व मुख्याधिकारी काम करतात का.? असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे या संदर्भात आता निवडणूक विभाग आणि स्थानिक प्रशासन काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

प्रमुख मुद्दे:
नियमांचे उल्लंघन: आचारसंहिता काळात कोणत्याही नवीन कामाचे उद्घाटन किंवा जाहिरातबाजी करण्यास मनाई असतानाही हे बॅनर दिमाखात उभे आहेत.

प्रशासनाचे मौन: या गंभीर प्रकाराकडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी आणि बॅनर प्रमुख मटरू चुनियान यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

दुजाभाव: विरोधकांच्या छोट्या कृत्यांवरही कडक कारवाई करणारे प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या या उघड नियमोल्लंघनावर गप्प का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागरिकांच्या मागण्या:
१. आचारसंहितेचे उल्लंघन करणारे हे बॅनर तात्काळ हटवण्यात यावेत.
२. नियम धाब्यावर बसवणाऱ्या संबंधित लोकप्रतिनिधींवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी.
३. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!