Homeब्रेकिंगजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पोलिसांकडून केराची टोपली; मनमाडमध्ये अवजड वाहनांची घुसखोरी सुरूच

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पोलिसांकडून केराची टोपली; मनमाडमध्ये अवजड वाहनांची घुसखोरी सुरूच

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पोलिसांकडून केराची टोपली; मनमाडमध्ये अवजड वाहनांची घुसखोरी सुरूच
मनमाड(अजहर शेख ) :- नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मनमाड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत इंदूर-पुणे महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचे कडक आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी करण्यात जिल्हा वाहतूक पोलीस  स्थानिक वाहतूक पोलीस सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरात अवजड वाहने बिनदिक्कतपणे शिरत असल्याने “जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला किंमत आहे की नाही?” असा संतप्त सवाल सामान्य मनमाडकर विचारत आहेत.यावर जिल्हाधिकारी साहेबांनी कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य व वाहतूक कोंडीने त्रस्त मनमाडकर करत आहेत.
                मनमाड हे रेल्वेचे जंक्शन स्थानक असुन मनमाड शहरांतून इंदूर पुणे हा राष्ट्रीय महामार्ग जातो यामुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे याचा फटका हा येवला शहरालाही बसतो  यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात बैठक बोलावली व यावर उपाय म्हणून या महामार्गावर दिवसा सकाळी ६ ते १० पर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद केली मात्र या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला जिल्हा वाहतूक पोलीस व स्थानिक वाहतूक पोलिसांनी केराची टोपली दाखवली असुन शहरात दिवसाही अवजड वाहनांची खुलेआम वाहतूक सुरू आहे यामुळे मनमाड व येवला शहरात रोज वाहतूक कोंडी होत आहे वाहतूक कोंडीला त्रासलेल्या नागरिकांनी आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला काही किंमत आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
या आहेत महत्वाच्या समस्या
◆आदेशाचे उल्लंघन: जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी ७ ते रात्री १० ही वेळ निश्चित केली असतानाही अवजड वाहने शहरात येत आहेत.
◆वाहतूक पोलिसांची भूमिका: वाहतूक पोलीस पर्यायी मार्गाने वाहने वळवण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
◆कोंडीचा विळखा: अवजड वाहनांमुळे शहरातील मुख्य चौक आणि रस्ते तासनतास जाम होत आहेत.
◆अपघाताची भीती: अरुंद रस्त्यांवरून मोठी वाहने जात असल्याने पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मनमाड येवला येथील नारिकांचा संताप
शहरातील व्यापारी आणि पालकांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “शाळेच्या बस आणि रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा फटका बसत आहे. जर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन पोलीसच करणार नसतील, तर जनतेने दाद कोणाकडे मागायची?” असा प्रश्न मनमाड व येवला शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!