Homeक्राईमखळबळजनक: मध्यरात्री तरुणाची निर्घृण हत्या; सुदर्शन चव्हाण खून प्रकरणाने परिसर हादरला

खळबळजनक: मध्यरात्री तरुणाची निर्घृण हत्या; सुदर्शन चव्हाण खून प्रकरणाने परिसर हादरला

मनमाड( प्रतिनिधी) :येथील ईदगाह परिसरात काल मध्यरात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. सुदर्शन सूरज चव्हाण असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व काही संशयतींना अटक केली आहे.
             मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुदर्शन चव्हाण याच्यावर काल मध्यरात्री काही तरुणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, सुदर्शनचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. भरवस्तीत झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. सुदर्शनचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जुना वाद, वैयक्तिक शत्रुत्व किंवा इतर काही कारणातून हा प्रकार घडला का, याचा शोध पोलीस घेत आहेत. भररस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुदर्शनला पाहून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच मनमाड उपविभागीय पोलिस अधीक्षक बाजीराव महाजन व पोलिस निरीक्षक विजय करे यांनी फौज फाट्यासह  तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत काही संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून, या गुन्ह्यात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.पुढील तपासासाठी मृतदेह स्थानिक शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे सुदर्शनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी परिसरातून होत आहे
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न

0
मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न ​मनमाड (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मनमाड शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि देशप्रेमाच्या रंगात न्हालेली एक भव्य...

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार...

0
नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र ​नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध...

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...

error: Content is protected !!