Homeताज्या बातम्यामाजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख...

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख मनोज मथुरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश 

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख मनोज मथुरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश 

येवला(प्रतिनिधी):-  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारी, समतेचा विचार मांडणारी आणि विकासाला प्राधान्य देणारा पक्ष आहे. पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याला संधी आहे, प्रत्येकाला पुढे जाण्याची जागा आहे. मनोजजींना देखील पक्षात योग्य सन्मान आणि जबाबदारी दिली जाईल. त्यांनी जे सामाजिक कार्य केले ते काम पुढे नेण्यासाठी त्यांना अधिक बळ दिले जाईल. तसेच येवला मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

येवला शहरातील बेलेश्वर महादेव मंदिर, विठ्ठल नगर येथे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख तथा महाराष्ट्र चर्मकार संघटनेचे येवला तालुकाध्यक्ष मनोज मथुरे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, शहराध्यक्ष दत्ता निकम, येवला नगरपालिकेचे गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक गोटू मांजरे, प्रवक्ते राजेंद्र भांडगे, महेश गादेकर, सुहास भांबारे, सुनील पैठणकर, डॉ.कांबळे, गणेश गायकवाड, भूषण लाघवे, प्रवीण पहिलवान, सचिन सोनवणे, सुमित थोरात, दिपक गायकवाड,पार्थ कासार, मंगेश शेलार, सौरभ जगताप, राकेश कुंभारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, मनोज मथुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, तो केवळ राजकीय नाही तर मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विकासाच्या कामांवर ठेवलेल्या विश्वासाचा निर्णय आहे. येवला मतदारसंघात गेल्या काही वर्षांत जी विकासकामे केली. त्यांनी हे विकासकार्य पाहिले, अनुभवले आणि त्यातून प्रेरणा घेत आज ते आपल्या कुटुंबात सामील झाले आहेत. त्यांच्या येण्याने पक्षाला नवी ऊर्जा मिळेल, विशेषतः तरुणांमध्ये आणि चर्मकार समाजात अधिक बळ मिळेल. त्यांचा पक्षात योग्य तो सन्मान राखला जाईल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मनोज मथुरे यांनी सामाजिक क्षेत्रात काम करताना समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांसाठी आवाज उठवला. चर्मकार समाजाचे नेतृत्व करताना तुम्ही अनेक प्रश्न मांडले, लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली नुकत्याच झालेल्या येवला नगरपालिका निवडणुकीत मनोज मथुरे यांनी धाडसाने निवडणूक लढवली. थोड्याशा मतांनी पराभव झाला, पण हा पराभव नाही. लोकांनी त्यांना दिलेला पाठिंबा हेच दाखवतो की येणाऱ्या काळात ते एक सक्षम उमेदवार म्हणून पुढे येतील.

*यांचा झाला पक्षप्रवेश….*

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख तथा महाराष्ट्र चर्मकार समाजाचे तालुकाध्यक्ष मनोज मथुरे, पत्नी उज्ज्वला मथुरे, पहिलवान ग्रुप अध्यक्ष आकाश मथुरे, शिवसेना सोशल मिडिया प्रमुख नितीन पिंपळे, शिवसेना विद्यार्थी शहराध्यक्ष अतुल शिंदे, रामा मुंगीकर, अमित नागपुरे, ऋषिकेश नागपुरे, किरण कडतन, मयुर मुंगीकर, संतोष मथुरे,विलास धारक, वैष्णव सोनवणे, जयश्री माळी,शीतल धारक, सुषमा भडांगे, माया रोडे, संगीता भालेरे, सुजाता बाबर, राजेश भावसार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

यावेळी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, प्रवक्ते राजेंद्र भांडगे, डॉ. कांबळे, शहराध्यक्ष दत्ता निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डिसेंबरपर्यंत ७०% फ्लीट टेक स्नॅग-मुक्त होईल: MSRTC

0
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : नवीन बसेसचा समावेश आणि जुनी वाहने स्क्रॅप केल्याने एमएसआरटीसीच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होईल, असे राज्याचे...

सर्वेक्षणानंतर वर्षभरानंतर, मेट्रो स्थानकांजवळील सार्वजनिक पार्किंगच्या जागेच्या विकासाला अद्याप गती मिळालेली नाही | पुणे...

0
वनाझ मेट्रो स्थानकाजवळ फूटपाथवर पार्किंग केलेल्या दुचाकी पुणे : पुणे महानगरपालिका (PMC) आणि महा मेट्रो यांनी मेट्रो स्थानकांजवळील सार्वजनिक पार्किंगसाठी ठिकाणे ओळखण्यासाठी केलेल्या...

मनमाडला पालिकेची ‘एक डोळा काजळ, एक डोळा माळ’ भूमिका? गोरगरिबांची अतिक्रमणे भुईसपाट, मात्र बड्या...

0
मनमाडला पालिकेची ‘एक डोळा काजळ, एक डोळा माळ’ भूमिका? गोरगरिबांची अतिक्रमणे भुईसपाट, मात्र बड्या व्यापाऱ्यांच्या बेशिस्त पार्किंगकडे कानाडोळा! https://youtu.be/QWdA48FWSQg?si=2DbDQGz_HoziRcZd मनमाड (विशेष प्रतिनिधी) :शहरात सध्या पालिका प्रशासन,...

4-5 मिनिटे वाचवण्यासाठी प्रस्तावित रस्त्यामुळे वेताळ टेकडीला धोका निर्माण झाला आहे

0
पुणे: पुणे महानगरपालिकेने अर्ध्या दशकाहून अधिक काळ प्रस्तावित बालभारती-पौड फाटा रस्ता हा कोंडीत सापडलेल्या शहरी वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा गहाळ दुवा मानला आहे. 2019...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

0
अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

error: Content is protected !!