मनमाड महाविद्यालयात व्यसनमुक्तीची शपथ

मनमाड(प्रतिनिधी):- भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विकसित भारत की पहचान अंतर्गत नशा मुक्त भारत अभियानात व्यसनमुक्तची सामूहिक शपथ महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर यांच्या समवेत घेण्यात आली. मादक पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम रोखणे, व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे तसेच समाजात जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. या उपक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले, कनिष्ठ विभागाचे उप प्राचार्य प्रा. सुभाष अहिरे, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. डी व्ही सोनवणे, कुलसचिव श्री समाधान केदारे, कार्यालयीन अधीक्षक श्री एल के निकम, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी हे सामूहिक शपथ घेण्यासाठी उपस्थित होते. या उपक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख




























