Homeब्रेकिंगमनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे गणेश धात्रक बिनविरोध; आमदार कांदेंना...

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे गणेश धात्रक बिनविरोध; आमदार कांदेंना मोठा धक्का

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे गणेश धात्रक बिनविरोध; आमदार कांदेंना मोठा धक्का

मनमाड(प्रतिनिधी):- स्थानिक राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अखेर भाजपचे गणेश धात्रक यांची बिनविरोध निवड झाली आहे. बाजार समितीचे संस्थापक आणि तत्कालीन माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांचे ते सुपुत्र आहेत. या निवडीमुळे मनमाडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विद्यमान आमदार सुहास कांदे यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.मनमाड बाजार समितीत अनेक घडामोडी घडल्या हे प्रकरण पणन संचनालय ते थेट सुप्रिम कोर्टापर्यंत गाजले आहे.
           २०२३ मध्ये झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांच्या पॅनलविरोधात माजी खासदार समीर भुजबळ, दीपक गोगड, माजी आमदार संजय पवार आणि गणेश धात्रक यांनी एकत्र येत महाविकास आघाडीची वज्रमूठ आवळली होती. या निवडणुकीत आमदार कांदे यांना पराभवाचा धक्का देत भुजबळ गटाने एकहाती सत्ता मिळवली आणि संजय पवार यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ घातली.मात्र, मनमाड बाजार समितीचे राजकारण इथेच थांबले नाही. काही महिन्यांतच अंतर्गत घडामोडींमुळे संजय पवार यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला आणि ते थेट आमदार कांदे यांच्या गटात सामील झाले. यानंतर दीपक गोगड यांच्याकडे सभापतीपदाची धुरा सोपवण्यात आली.सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेली लढाई सत्ता बदलानंतर मनमाड बाजार समितीमधील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला. हे कायदेशीर प्रकरण थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. न्यायालयीन लढाईत दीपक गोगड यांचे संचालक पदच रद्द ठरवण्यात आले, ज्यामुळे बाजार समितीचे सभापतीपद पुन्हा रिक्त झाले आणि राजकीय समीकरणे वेगाने बदलली व पुन्हा एकदा संजय पवार सभापती झाले मात्र काही महिन्यातच दीपक गोगड यांचे संचालक पद गेल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा तगडी व्यूहरचना आखली. पुन्हा एकदा समीर भुजबळ गोगड, धात्रक आणि पवार हे नेते पुन्हा एकत्र आले. त्यांनी अत्यंत गुप्तपणे राजकीय डावपेच खेळत आमदार सुहास कांदे यांच्या गटातील काही संचालकांना आपल्या बाजूने फोडण्यात यश मिळवले. बहुमताचे गणित आपल्या बाजूने फिरवत या त्रिकुटाने गणेश धात्रक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अखेर आज झालेल्या निवडणुकीत विरोधकांकडे संख्याबळ नसल्याने भाजपचे गणेश धात्रक यांची सभापतीपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.या नाट्यमय घडामोडींमुळे मनमाड बाजार समितीवरील आमदार कांदे यांचे वर्चस्व संपुष्टात आले असून, धात्रक यांच्या बिनविरोध निवडीमुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
वडिलांनी स्थापन केलेल्या बाजार समिती मुलगा सभापती
नांदगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार तत्कालीन आमदार जगन्नाथ धात्रक यांनी समितीचे १९८५ साली  विभाजन करून मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केली मात्र तेव्हापासून आजतागायत धात्रक घराण्यातील एकही जण संचालक झालेला नव्हता मात्र २०२३ साली गणेश धात्रक यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली व सर्वात जास्त मतदान मिळवून बाजार समितीत एकहाती सत्ता स्थापन केली मात्र तेव्हा मंत्री छगन भुजबळ यांनी सभापतीपद देऊ केले मात्र त्यांनी ते घेतले नाही तद्नंतर दीपक गोगड यांनाही दिले मात्र आता संघर्ष करून पहिल्यावेळी ते बाजार समितीचे सभापती झाले आहेत.
हायहोलटेज ड्रामा व 300 पोलिसांचा बंदोबस्त…!
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मागेही आमदार कांदे व धात्रक गटात तुफान राडा झाला होता यावेळीही मोठा हायहोलटेज ड्रामा झाला व कायदा सुव्यवस्था बिघडू नये याशिवाय संचालकांना सुरक्षा म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जवळपास 16 अधिकारी ग इतर कर्मचारी असा 300 पोलिसांचा फौंजफाटा लावला होता याशिवाय आज पोलिस निरीक्षक विजय करे यांनी कोणत्याही प्रकारची मिरवणूक व इतर जल्लोष करण्यासाठी परवानगी न दिल्याने करे व धात्रक यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न

0
मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न ​मनमाड (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मनमाड शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि देशप्रेमाच्या रंगात न्हालेली एक भव्य...

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार...

0
नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र ​नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध...

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...

error: Content is protected !!