Homeनांदगांवनांदगाव पोलीस प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईनंतर प्रवीण गुप्तांचे १ जुलैचे आमरण उपोषण मागे!...

नांदगाव पोलीस प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईनंतर प्रवीण गुप्तांचे १ जुलैचे आमरण उपोषण मागे! तब्बल एक वर्षानंतर तक्रारीची दखल  व्हॉट्सॲपवरून धमकी देणाऱ्याला गुप्तांचे जाहीर आव्हान, १५ ऑगस्टचा प्रशासनाला अल्टिमेटम

नांदगाव पोलीस प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईनंतर प्रवीण गुप्तांचे १ जुलैचे आमरण उपोषण मागे! तब्बल एक वर्षानंतर तक्रारीची दखल

 व्हॉट्सॲपवरून धमकी देणाऱ्याला गुप्तांचे जाहीर आव्हान, १५ ऑगस्टचा प्रशासनाला अल्टिमेटम

नांदगाव (विशेष प्रतिनिधी):येथील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते  प्रवीण मधुकर गुप्ता यांनी प्रशासकीय दिरंगाई विरोधात पुकारलेले १ जुलैचे आमरण उपोषण तूर्तास मागे घेतले आहे. गेल्या एक वर्षापासून प्रलंबित असलेली त्यांची तक्रार नांदगाव पोलिसांनी तात्काळ नाशिक ग्रामीणच्या सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यासोबतच गुप्ता यांनी व्हॉट्सॲप कॉलद्वारे धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाला खुले आव्हान देत प्रशासनाला पुढील कारवाईसाठी १५ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.

​काय आहे संपूर्ण प्रकरण?

 २ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री २१:१३ वाजता प्रवीण गुप्ता यांच्या मोबाईलवर युनायटेड किंगडम (+४४) या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून एक व्हॉट्सॲप व्हॉईस कॉल आला होता. त्या अज्ञात इसमाने गुप्ता यांना, “तुझ्या मेडिकल दुकानात गांजा ठेवून देईल, तुझी सहा महिने बेल होऊ देणार नाही” अशी खोटी केस करून अडकवण्याची आणि जीवे मारण्याची गंभीर धमकी दिली होती. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NCR No. 0091/2025, कलम 351(4)) नोंदवण्यात आला होता.

​वर्षभराची दिरंगाई आणि पीआय साहेबांची तात्काळ कारवाई

​या तक्रारीवर गेल्या वर्षभरात कोणतीही ठोस तांत्रिक कारवाई झाली नव्हती. त्यामुळे संतप्त होऊन प्रवीण गुप्ता यांनी आगामी १ जुलै २०२६ पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. या उपोषण पत्राची दखल घेत नांदगाव पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक (PI) यशवंत एम. सोळसे यांनी काल प्रवीण गुप्ता यांना पोलीस स्टेशनला चर्चेसाठी बोलावले.चर्चेदरम्यान, वर्षभरापासून प्रलंबित असलेली ही तक्रार तात्काळ सायबर पोलिसांकडे (CDR/IP Log/Subscriber Details मिळवण्यासाठी) वर्ग करण्यात आली. पोलिसांच्या या तत्परतेबद्दल प्रवीण गुप्ता यांनी  पीआय सोळसे  आणि नांदगाव पोलिसांचे जाहीर आभार मानले असून, सकारात्मक मार्ग निघाल्याने १ जुलैचे उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.

​धमकी देणाऱ्याला ‘गुप्ता स्टाईल’ने जाहीर आव्हान!

​उपोषण मागे घेत असतानाच प्रवीण गुप्ता यांनी व्हॉट्सॲप कॉल करून मागून धमक्या देणाऱ्या समाजकंटकाचा खरपूस समाचार घेतला. गुप्ता म्हणाले,

​”तुझ्यात जर खरच दम असेल, तर आंतरराष्ट्रीय किंवा अनोळखी नंबरवरून कॉल न करता, स्वतःच्या नंबरवरून कॉल करून समोर येऊन धमकी दे. मग मी तुला दाखवून देईन की प्रवीण गुप्ता काय चीज आहे! माझे कोणतेही दोन नंबरचे धंदे नाहीत आणि तुझ्याकडे मला जेवायलाही यायचे नाही. मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही.”

​१५ ऑगस्टचा ‘अल्टिमेटम’ कायम

​तूर्तास पोलिसांनी योग्य पाऊल उचलल्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले असले, तरी प्रवीण गुप्ता यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, सायबर विभागाकडून या आंतरराष्ट्रीय क्रमांकाच्या मूळ वापरकर्त्याचा शोध घेऊन जर पुढील ठोस कारवाई झाली नाही, तर आगामी १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर पुन्हा आमरण उपोषणास बसणार, याची प्रशासनाने नोंद घ्यावी.

​या सर्व प्रकरणाकडे आता संपूर्ण नांदगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिले असून, आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धमकी देणारा तो अज्ञात सूत्रधार कोण? याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान सायबर पोलिसांसमोर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न

0
मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न ​मनमाड (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मनमाड शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि देशप्रेमाच्या रंगात न्हालेली एक भव्य...

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार...

0
नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र ​नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध...

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...

error: Content is protected !!