खासदार अरविंद सावंत यांचा आमदार कृपाल तुमाने आणि जैन समाज वादावर जोरदार हल्लबोल मनमाड पोटनिवडणूक प्रचार शिगेला

मनमाड (प्रतिनिधी) : – “कृपाल तुमाने हा गल्लीतील कॉमेडियन आहे. त्याच्या स्वतःच्या पक्षात त्याला काहीच किंमत नाही. ‘ऑपरेशन टायगर’ करायला आधी तिकडे टायगर शिल्लक तर असायला हवेत! तिथे सगळे दात काढलेले वाघ असून ते दिल्लीपुढे लाचार झाले आहेत आणि गृहमंत्र्यांच्या पायावर डोके ठेवणारे लोक आहेत,” अशा शेलक्या शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांचा खरपूस समाचार घेतला.मनमाड येथील प्रभाग क्रमांक १० मधील दोन जागांसाठी होत असलेल्या महापालिका पोटनिवडणुकीतील ‘उबाठा’ उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार अरविंद सावंत मनमाडला आले होते. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’ आणि मुंबईतील जैन समाजाच्या वादावरून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली.’
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात असल्याचे विधान केले होते. या विधानाचा समाचार घेताना खासदार सावंत म्हणाले, “कोण कृपाल तुमाने? मुळात पक्षात त्याची पत काय आहे? स्वतःच्या पक्षात किंमत नसलेले लोक अशा वलग्ना करत आहेत. जे स्वतः दिल्लीच्या तालेवारांसमोर लाचार झाले आहेत, त्यांनी वाघाच्या गोष्टी करू नयेत.”मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांचा वाद: “हा १०० टक्के धार्मिक दहशतवाद” असल्याची टीका त्यांनी केली मुंबईतील जैन समाजाकडून ठिकठिकाणी फूटपाथवर पांढरे पट्टे ओढण्यात येत असल्याच्या वादावर खासदार सावंत यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली.पैशाचा आणि सत्तेचा माज: “हा १०० टक्के धार्मिक दहशतवाद आहे. आपण सर्व सामान्य नागरिक आहोत ना? मग रस्त्यावर असे पांढरे पट्टे मारणे हा दहशतवाद नाही तर काय? तिथल्या सोसायट्यांमध्ये मांसाहार करणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही. हे जे लोक करत आहेत, त्यांना एकतर पैशाचा माज आहे किंवा सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या डोक्यावर हात आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.कोणत्याही धर्माच्या नावाखाली नागरिकांना प्रतिबंधित केले जात असेल, तर महापालिकेने अशा गोष्टींना अजिबात परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. “धर्माच्या नावावर चाललेला हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे,” असेही ते म्हणाले.मनमाड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार अरविंद सावंत यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे स्थानिक राजकारणासोबतच राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापण्याची शक्यता आहे.यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते दत्ता गायकवाड शिवसेनेचे हमीदभाई शेख यांच्यासह दिंडोरी लोकसभा प्रमुख जयंत दिंडे जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक शहरप्रमुख माधव शेलार यांच्यासह इतर शिवसेना नेते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रभाग १० मध्ये आमचा विजय निश्चित…!खासदार सावंत यांनी यावेळी मनमाड शहरातील प्रभाग 10 मध्ये प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन प्रचार केला रॅली काढुन त्यांनी मतदारांना आवाहन केले प्रत्येक मतदाराला त्यांनी यावेळीं भेट दिली व शिवसेना उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी या दोन्ही महिलांना आपण निवडुन द्या अशी साद घातली यावेळी त्यांनी रॅली आणि जनतेचा प्रतिसाद बघून आमचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
























