Homeमनमाडलायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीची प्रांतपाल भेट संपन्न..

लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीची प्रांतपाल भेट संपन्न..

लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीची प्रांतपाल भेट संपन्न..

मनमाड(अजहर शेख) : लायन्स इंटरनॅशनल ही सेवाभावी संस्था जगातील दोनशे पेक्षा जास्त देशात कार्यरत आहे. समाज हिताचे अनेक उपक्रम या संस्थेमार्फत राबविले जातात. मनमाड शहरात ही गेल्या चाळीस वर्षापासून लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी नावाने ही सेवाभावी संस्था निरंतर सेवाकार्य करीत आहे. या वर्षीची डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्हिजीट अर्थात प्रांतपाल भेट नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी पुणे, नासिक आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल पीएमजेएफ ला. राजेशजी अग्रवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.पुण्याहून व्हि.के.शर्मा, योगेश अग्रवाल , मनोज अग्रवाल यांची विशेष उपस्थिती होती. ला.राजेश अग्रवाल यांनी क्लबच्या वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला आणि क्लबच्या कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी क्लबचे संस्थापक सचिव आणि वरीष्ठ सदस्य ॲड. शशिकांत व्यवहारे यांनी क्लबच्या प्रगतीचा आलेख स्पष्ट करून भविष्यातील योजनांची माहिती दिली. क्लबचे प्रेसिडेंट एमजेएफ लायन डॉ. जे. वाय. इंगळे यांनी वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन अहवाल सादर केला. सचिव ला. प्रितम मंत्री आणि खजिनदार ला. भारत जगताप यांनी आपले अहवाल सादर केले. क्लबच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून केक कापून क्लबचा चाळीसवा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेशजी अग्रवाल यांनी क्लबच्या सर्व महिला सदस्यांना महिला दिनानिमित्त गुलाब पुष्प आणि डिस्ट्रिक्ट पिन देऊन सन्मानित केले. यासह सर्व वरीष्ठ सदस्यांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. पाहूण्यांचा परीचय ला.संगिता कदम यांनी तर प्रार्थना वाचन ला.सुनिता डघळे यांनी केले.वरीष्ठ सदस्या माजी अध्यक्षा ला. पुष्पाताई मतकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न प्रांतपाल भेट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. हर्षद गद्रे आणि ला.हेमंत कातकडे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रेसिडेंट डॉ.जे.वाय.इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली ला.डॉ.प्रताप गुजराती, राजेंद्र माळी, गणेश हाडपे, रेखा येणारे, सिध्दार्थ जोगदंड यांनी केले.यावेळी डॉ. शांताराम कातकडे, डॉ. संजय सांगळे, मृणालिनी सांगळे, कविता इंगळे, सप्तेश गुप्ता, डॉ.सागर कोल्हे,पुष्पलता मोरे, वैशाली वाणी, पंकज खताळ, पद्ममाकर कुलकर्णी, मनिषा अग्रवाल यासह अनेक सदस्य बंधु-भगिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!