Homeताज्या बातम्यालढावू कामगार नेते डॉ.डी.एल.कराड यांना “भीष्माचार्य” पुरस्कार प्रदान....

लढावू कामगार नेते डॉ.डी.एल.कराड यांना “भीष्माचार्य” पुरस्कार प्रदान….

लढावू कामगार नेते  डॉ.डी.एल.कराड यांना “भीष्माचार्य” पुरस्कार प्रदान….

मुंबई(राजेंद्र धिंगाण):- मुंबई येथे “रंग शारदा नाट्य मंदिर” येथे संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष तसेच कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे मुख्य समन्वयक आणि राज्यातील कामगारांचे लढवय्ये नेते डॉ. डी एल कराड यांना “भीष्माचार्य” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कामगार मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते “पुरस्कार व मानपत्र” प्रदान करण्यात आले.यावेळी उद्घाटक म्हणून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप,भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष व “द्रोणाचार्य” पुरस्काराचे मानकरी खासदार अरविंद सावंत, भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीपभाई जगताप यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते.

यावेळी डॉ. डी. एल.कराड यांना विशेष मानपत्र, स्मृतीचिन्ह देण्यात आले. मानपत्रात डॉ. डी. एल. कराड यांचा खालील शब्दात गौरव करण्यात आला आहे….

“कामगार चळवळीतील पितृतुल्य नेतृत्वाचा सन्मान”

“आपण कामगारांच्या न्याय हक्कांसाठी भीष्म-प्रतिज्ञा करून आयुष्यभर अविरत संघर्ष केला आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष (CITU) या नात्याने आपण चार दशकांहून अधिक काळ कामगार चळवळीचे निष्ठावान, धैर्यशील व तत्त्वनिष्ठ सेनानी म्हणून कार्यरत आहात.आपल्या देदिप्यमान, कार्यकुशल व कर्तृत्ववान नेतृत्वाने कामगारविरोधी धोरणे, अन्याय व शोषण यांच्या विरोधात शर्थीचा लढा दिला. मालक-शासन-न्यायव्यवस्था या सर्व आघाड्यांवर आपण कामगारांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलात. कारावास, खटले, दडपशाही या संकटांना न जुमानता कामगारांच्या हक्कांसाठीची लढाई आपण अखेरपर्यंत लढतच आहात हीच आपली भीष्म-प्रतिज्ञा आहे.कामगार चळवळीच्या रक्षणासाठी वय, पद, सत्ता यांची पर्वा न करता आपण आयुष्य समर्पित केले. आजही तरुण कार्यकर्त्यांना आपण प्रेरणा देत आहात. कामगारांच्या पिढ्यान पिढ्या घडवणारे, त्यांना लढण्याचे बळ देणारे आपले कार्य भीष्माचार्यासारखेच पितृतुल्य व संरक्षक आहे.आपल्या अतुलनीय योगदानाचा गौरव म्हणून जागतिक कामगार दिन, महाराष्ट्र दिन व भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचा ३७ वा वर्धापन दिन या शुभसंधीचे औचित्य साधून, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ आपणास “भीष्माचार्य पुरस्कार” सन्मानपुर्वक प्रदान करताना आम्हास अत्यानंद होत आहे.”

यावेळी हर्षवर्धन सपकाळ, खासदार अरविंद सावंत, आमदार भाई जगताप, दिलीप जगताप या वक्त्यांनी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद केले व कामगार विरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी कामगार वर्गाने एकजुटीने प्रखर संघर्षास तयार व्हावे, सर्व संघटनानी मतभेद विसरून यासाठी एकत्र आले पाहिजे असे आवाहन केले.

डॉ.डी.एल.कराड यांनी सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना कामगारांचे संरक्षण करणारे 29 कामगार कायदे रद्द केल्याबद्दल केंद्र सरकारवर कठोर टीका केली तसेच जुने कामगार कायदे प्रस्थापित करण्याचे मागणी केली. कंत्राटीकरण खाजगीकरण यामुळे कामगार वर्गाची शोषण तीव्रपणे वाढले असल्याचे नमूद करून कंत्राटी कामगारांना कायम करण्याची मागणी मेळाव्यात करण्यात आली. राज्य सरकार किमान वेतनात वाढ करण्याबाबत टाळाटाळ करीत आहे असे प्रतिपादन केले.

डॉ. कराड यांनी हा पुरस्कार चळवळीतील मार्गदर्शक कॉम्रेड नरेंद्र मालुसरे,अड.द.तु.
जायभावे व कामगार चळवळीतील संघर्षातील सहकाऱ्यांना समर्पित करीत असल्याचे सांगितले. पुरस्कार दिल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!